Sankarshan Karhade Bus Driving Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sankarshan Karhade Bus Driving Video: अभिनेत्याऐवजी संकर्षणची दुसरी बाजू पाहिलीत का?, ड्रायव्हरची तब्येत बिघडल्याने चालवली बस

Sankarshan Karhade Driving: सोशल मीडियावर ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी संकर्षणची कधीही न पाहिलेली बाजू सर्वांना दाखवली.

Chetan Bodke

Sankarshan Karhade Drive Bus Pune To Lonavala: मराठी ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले आमि अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हे दोघेही, ‘नियम व अटी लागू’ या नाटकामुळे बरेच चर्चेत आहे. सध्या हे दोघेही नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यग्र असून नाटकांचे प्रयोग सध्या महाराष्ट्रभरात जोरात सुरू आहे. नुकतंच सोशल मीडियावर ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. प्रशांत दामले नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष झाल्यापासून प्रशांत दामले सध्या नाटकांसंबंधितच्या प्रश्नांबद्दल अग्रेसर असताना दिसतात. प्रशांत दामलेंनी सोशल मीडियावर संकर्षणची कधीही न पाहिलेली बाजू सर्वांना दाखवली.

‘नियम व अटी लागू’ या नाटकामध्ये अभिनेते प्रशांत दामले आणि संकर्षण सह अमृता देशमुख आणि प्रसाद बर्वे हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘नियम व अटी लागू’ या नाटकामुळे प्रशांत दामले सध्या सोशल मीडियावर कमालीचे चर्चेत आहेत. प्रेक्षकांकडून नाटकाला भरघोस प्रतिसाद मिळत असून नुकताच पुण्यातील कोथरूडमध्ये नाटकाचा प्रयोग पाडला. प्रयोगावरून परतत असताना संकर्षणच्या चाहत्यांना संकर्षणचे एक वेगळेच रूप पाहायला मिळाले.

‘नियम व अटी लागू’ या नाटकाची निर्मिती गौरी थिएटर व प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित नाटकाचा प्रयोग काल कोथरूडमध्ये पार पडला. नाटकावरून परतत असताना अचानकच बसच्या ड्रायव्हरची तब्येत बिघडली. ड्रायव्हरची तब्येत बिघडल्यामुळे मुंबईला कसे जायचे असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. यावेळी संकर्षणने पुढे येत सर्वांना मुंबईला पोहोचवण्याची जबाबदारी खांद्यावर घेत त्याने हे धाडस केले. प्रशांत दामलेंसह नाटकातील सर्वच कलाकारांनी आणि इतरांनीही त्याचे कौतुक केले. प्रशांत दामलेंनी संकर्षणसाठी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे.

प्रशांत दामलेंनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली की, “काल रात्री कोथरूडच्या प्रयोगाला आमचा चालक प्रवीण ह्याला बर वाटेनास झाल. साधारणपणे प्रयोग 12.30 ला संपल्यावर आम्ही सेट भरून जेवून पहाटे 2 च्या सुमारास मुंबईकडे निघतो. पण चालक आजारी पडला म्हटल्यावर सगळच थांबल. पण थांबेल तो संक्या कसला. त्याने चालकाला मागे झोपवल आणि स्वतः ड्राइवर सीटवर बसला आणि लोणावळ्यापर्यंत बस हाणली. त्याच्याकडे हेवीचा पण लायसन आहे हे कालच मला कळले. लोणावळ्याला ड्राइवर ओके आणि मग संक्या मागे जाऊन झोपला. इसको बोलता हैं जिगर नाटकाचे प्रयोग आणि बस एकाच स्पीड ने चालु आहेत...” अशा आशयाची पोस्ट लिहित त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

प्रशांत दामलेंची ही पोस्ट पाहून चाहते म्हणतात, “१ नंबर संकर्षण सर! जो व्यक्ती जमिनीवर राहून काम करतो ना त्यांनाच हे जमतं...” तर आणखी एक म्हणतो, “माणसात देव असतो म्हणतात त्याची प्रचिती”, तर आणखी एक जण म्हणतो, “ऑल राऊंडर आहे संकर्षण तू...” असं म्हणत अनेकांनी संकर्षणचं तोंड भरून कौतुक केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबारमधील तापी नदीवरील प्रकाशा पुलाची दुरावस्था, खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT