Dharmaveer 2 Release Date Instagram
मनोरंजन बातम्या

Dharmaveer 2 Release Date : 'धर्मवीर २' केव्हा रिलीज होणार ? निर्मात्यांनी जाहीर केली नवी तारीख

Dharmaveer 2 Release Date Extend : राज्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे आणि ओढवलेल्या पूरपरिस्थितीमुळे प्रवीण विठ्ठल तरडे दिग्दर्शित 'धर्मवीर २' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

Chetan Bodke

बहुचर्चित "धर्मवीर २" चित्रपटाचं प्रदर्शन महाराष्ट्रात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे लांबणीवर पडले होते. राज्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे आणि ओढवलेल्या पूरपरिस्थितीमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. आता निर्मात्यांनी चित्रपटाची पुढची रिलीज डेट जाहीर केली आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे.

सध्याची राज्यातली पूरपरिस्थिती नियंत्रणात असून दीड महिन्याचा अवधी घेऊन येत्या २७ सप्टेंबरला "धर्मवीर २" चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय आता निर्मात्यांनी घेतला आहे. झी स्टुडिओजने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदर्शनाची रिलीज डेट जाहीर केली आहे. ""धर्मवीर- २ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट... " २७ सप्टेंबरपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात !" असं कॅप्शन देत त्यांनी "धर्मवीर २"च्या निर्मात्यांनी रिलीज डेटची माहिती दिली आहे.

२०२२ मध्ये रिलीज झालेल्या "धर्मवीर" चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केल्यानंतर दोन वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर चित्रपटाचा सीक्वेल रिलीज होणार आहे. चित्रपटामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाची गोष्ट पाहायला मिळणार आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या भूमिकेत अभिनेता प्रसाद ओक आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत अभिनेता क्षितिज दाते आहे. मल्टीस्टारर चित्रपटाची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. "धर्मवीर २" चित्रपट येत्या २७ सप्टेंबरला मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: ऑस्ट्रेलियासमोर भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली; अवघ्या १५० रन्समध्ये खुर्दा

Maharashtra Exit Poll : निलंगा विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण?

Saam Exit Poll: डोबिंवली विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपमधून रवींद्र चव्हाण मारणार बाजी? पाहा Exit Poll

कणकवलीत नितेश राणे पुन्हा मारणार बाजी? पाहा Exit Poll

Exit Poll Maharashtra : बीडमध्ये शरद पवार की अजित पवार? कोणाचा उमेदवार मारणार बाजी? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT