Prajakta Mali Praising India Vs Australia World Cup Final Match Instagram
मनोरंजन बातम्या

World Cup Final 2023: ‘आजची मॅच जिंकू दे रे देवा…’; प्राजुने लाडक्या गणरायाकडे टीम इंडियासाठी घातलं साकडं...

India Vs Australia World Cup Final 2023: टीम इंडिया जिंकावी म्हणून मराठी सेलिब्रिटींनीही देवाला साकडे घातले आहे.

Chetan Bodke

Prajakta Mali Praising India Vs Australia World Cup Final Match

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप फायनल मॅच सुरु झाली आहे. टीम इंडिया जिंकावी म्हणून देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होमहवन झालेले आपण पाहिले असेल. अशातच आता टीम इंडिया जिंकावी म्हणून मराठी सेलिब्रिटींनीही देवाला साकडे घातले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) अंतिम सामना सुरु आहे. अवघ्या देशाचे या सामन्याकडे लक्ष लागले असून कोट्यवधी भारतीय टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. अशातच मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने पोस्ट करत गणरायाला साकडं घातलंय.

शेअर केलेल्या पोस्टमध्ये प्राजक्ता माळीने थेऊरच्या चिंतामणीचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना, ‘श्री चिंतामणी गणपती- थेऊर. आजची मॅच जिंकू दे रे देवा…’ अशी कॅप्शन दिली आहे. तिच्या ह्या फोटोवर नेटकऱ्यांनी ‘आजची मॅच आपणच जिंकणार’ अशी कमेंट केली आहे. ‘हो प्राजु आपणच जिंकणार नक्की, गणपती बाप्पा मोरया...’ अशी कमेंट चाहत्यांनी केली आहे.

तर अभिनेत्री मिथीला पालकर सुद्धा थेट अहमदाबादमध्ये जाऊनच मॅच पाहत आहे. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. यावेळी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही सामन्याला उपस्थित राहिले आहे. रणवीर सिंग, दीपिका पादुकोण, रजनीकांत, कतरिना कैफ, विकी कौशल, उर्वशी रौतेला, शाहिद कपूर या सेलिब्रिटींनी फायनल बघायला उपस्थित लावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT