२०२३ च्या वर्ल्डकपचा (World Cup 2023) थरार आता अंतिम टप्प्यामध्ये आला आहे. आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये (India Vs Australia) अंतिम सामना रंगणार आहे. अवघ्या देशाचे या सामन्याकडे लक्ष लागले असून कोट्यवधी भारतीय टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत.
कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीही टीम आजचा क्रिकेट सामना खेळेल. टीम इंडियाला चिअर्स करण्यासाठी अहमदाबादमध्ये (Ahemadabad) आज लाखो चाहते दाखल झाले आहेत. यावेळी विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी सुद्धा या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी अहमदाबादमध्ये पोहोचले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम सामना पाहण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (Prime Minister Narendra Modi) अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सुद्धा उपस्थिती दर्शवणार आहेत (Bollywood Celebrity). दीपिका पदुकोण, ऐश्वर्या राय बच्चन, उर्वशी रौतेलासह अनेक सेलिब्रिटी उपस्थिती लावणार आहेत.
नुकतंच ‘एएनआय’ (ANI) वृत्तसंस्थेसोबत बोलताना अभिनेता सोनु सूदने टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘मी टीम इंडियाचे आधीपासूनच अभिनंदन करतो. जेव्हा संघामध्ये खूप चांगले खेळाडू असतात, त्यावेळी आपला विजय निश्चित असतो. टीम इंडियाच्या विजयासाठी संपूर्ण देश प्रार्थना करत आहे. जेव्हा कोणीही मनापासून प्रार्थना करतात, तेव्हा त्याची प्रार्थना नक्कीच पूर्ण होते. ऑल द बेस्ट टीम इंडिया.’ अशी भावना अभिनेत्याने व्यक्त केली आहे.
तर उर्वशी रौतेलानेही टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. टीम इंडियाला चिअर्स करण्यासाठी अहमदाबादमध्ये अभिनेत्री उर्वशी रौतेलाही पोहोचली आहे. ‘मी आजचा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. मला विश्वास आहे की, टीम इंडिया वर्ल्डकप ट्रॉफी जिंकेल.’ सोबतच, तिचा फेव्हरेट क्रिकेटर कोणता? या प्रश्नावर तिने संपूर्ण टीम इंडिया माझी फेव्हरेट आहे, असं उत्तर दिलं.
रवीना टंडननेही टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या असून, ‘ऑल द बेस्ट टीम इंडिया. लेहरा दो तिरंगा. जय हिंद जय भारत...’ अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे. पुलकित सम्राटने आमच्या प्रार्थना कायमच टीम इंडियासोबत आहेत, असं म्हणत त्याने टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना पाहण्यासाठी फक्त बॉलिवूड सेलिब्रिटीच नाही तर राजकीय, उद्योग आणि क्रिकेटमधले दिग्गज मंडळीही उपस्थित राहिले होते. भारताचे महान कर्णधार कपिल देव, बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्या, उद्योगपती मुकेश अंबानी आणि उद्योगपती गौतम अदानी सुद्धा उपस्थित राहणार आहेत. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.