
Parveen Babi Biopic : बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांपासून बायोपिकची चलती आहे. बऱ्याच स्टार्सनी बायोपिकमध्ये काम केले आहे. आता या यादीत मॉडेल आणि अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या नावाचाही समावेश झाला आहे.
अभिनेत्री आता ज्येष्ठ अभिनेत्री परवीन बाबीचा बायोपिकही घेऊन आपल्या भेटीला येत आहे. अभिनेत्री उर्वशी रौतेलाने एक पोस्ट देखील शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने हा बायोपिक सरकारण्यास अभिमान वाटत असल्याचे सांगितले आहे.
उर्वशी रौतेलाने तिच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये वसीम एस खान यांनी चित्रपटाची कथा लिहिली असल्याचे दिसत आहे. (Latest Entertainment News)
परवीन बाबीचे नाव ठळक अक्षरात लिहिले आहे आणि दोन परिच्छेद आहेत ज्यात असे लिहिले आहे की, 'हा चित्रपट अभिनेत्रीच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल तसेच तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी भाष्य करेल. तिचे सोनेरी क्षण पडद्यावर मांडणार आहोत.
तर अभिनेत्रीने कॅप्शन लिहिले की, 'बॉलिवूडमध्ये अयशस्वी झाली पण मला परवीन बाबीचा अभिमान वाटेल. ओम नमः शिवाय. खरंच हा नवा प्रवास सुंदर आहे. उर्वशी रौतेलाला परवीन बाबीच्या बायोपिकमध्ये पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
परवीनने 1972 साली मॉडेलिंगने तिच्या करिअरची सुरुवात केली आणि 1973 मध्ये परवीन बाबी यांनी त्यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात 'चरित्र' या चित्रपटापासून केली. परवीन बेबीने अनेक उत्तम चित्रपटांमध्ये कामी केले आहे.
प्रोफेशनल लाईफसह परवीन तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत होती. अभिनेत्रीचे नाव अनेक स्टार्सशी जोडले गेले होते. 22 जानेवारी 2005 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. अभिनेत्री तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली.
उर्वशी रौतेलाविषयी बोलायचे झाले तर, नुकतीच तिच्या नवीन घराविषयी जोरदार चर्चा रंगली होती. उर्वशीने मुंबईत १९० कोटींचे घर खरेदी केले आल्याचे सांगण्यात येत होते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.