Aamir Raza Husain Dies At 66 : भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक बड्या स्टार्सनी यावर्षी जगाचा निरोप घेतला. एकापाठोपाठ एक येणाऱ्या वाईट बातम्यांमुळे कलाकारांनाही धक्का बसला आहे. चित्रपट जगतातील प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते आणि कलाकार आमिर रझा हुसैन यांचे निधन झाले आहे.
आमिर रझा हुसैन यांच्या निधनानंतर इंडस्ट्रीला आणखी एक धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी विराट तलवार आणि दोन मुले असा परिवार आहे. (Latest Entertainment News)
शनिवारी, ३ जून रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने चित्रपट जगतात शोककळा पसरली आहे. 'बाहुबली', 'आरआरआर' आणि आता आगामी 'आदिपुरुष' यांसारख्या मोठ्या पडद्यावरील चित्रपटांच्या खूप आधी, आमिर रझा हुसैन यांनी भारताला २०१२ साली प्रदर्शित झालेल्या 'द फिफ्टी डे वॉर' या मेगा थिएटरचा अनुभव देणाऱ्या चित्रपटाची निर्मिती केली होती.
हुसेन यांचा जन्म 6 जानेवारी 1957 रोजी एका कुलीन अवधी कुटुंबात झाला. त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. हुसेन यांचे संगोपन त्यांच्या आईने केले. हुसैन यांनी त्यांचे शालेय शिक्षण मेयो कॉलेज, अजमेर येथे पूर्ण केले.
त्यानंतर सेंट स्टीफन कॉलेजमध्ये त्यांनी इतिहासाचा अभ्यास केला. कॉलेजमध्येच त्यांनी जॉय मायकेल, बॅरी जॉन आणि मार्कस मर्च सारख्या दिग्गजांच्या दिग्दर्शनाखाली अनेक नाटकांमध्ये अभिनय केला.
हुसेन यांनी दोन चित्रपटांमध्ये काम केले. किम (1984), पीटर ओ'टूल अभिनीत रुडयार्ड किपलिंगच्या कादंबरीवर आधारित चित्रपट आणि शशांक घोषचा रोमँटिक कॉमेडी ड्रामा खुबसूरत (2014), या चित्रपटामध्ये सोनम कपूर आणि फवाद यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.