हिंदी मनोरंजन विश्वातून दुर्देवी बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय गढवी यांचे निधन झाले आहे. रविवार, 19 नोव्हेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 57व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. संजय गढवी यांच्या निधनाने हिंदी सिने जगतावर शोककळा पसरली आहे.
'धूम' आणि 'धूम २' या सारख्या गाजलेल्या सिनेमांचे दिग्दर्शक संजय गढवी (Sanjay Gadhvi) यांचं निधन झालं आहे. संजय गढवी हे सकाळी लोखंडवाला बॅकरोड येथे फिरायला जात असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले आणि ते घामाने भिजले. यानंतर संजय गढवी यांना तातडीने जवळच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी संजय गढवी यांना मृत घोषित केले.
दिग्दर्शक संजय गढवी यांचे पार्थिव सध्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात आहे. 19 नोव्हेंबरच्या रात्री उशिरापर्यंत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
संजय गढवी यांनी ‘धूम’ आणि ‘धूम 2’ दिग्दर्शित केले होते. त्यांनी ‘तेरे लिए’, ‘किडनॅप’, ‘मेरे यार की शादी है’, ‘ऑपरेशन परिंदे’ आणि ‘अजब गजब लव्ह’ यांसारख्या शानदार चित्रपटांचे दिग्दर्शनही केले होते.
संजय गढवी यांनी ‘धूम’ आणि ‘धूम 2’ दिग्दर्शित केले होते. या सिनेमांनी त्यांना यशाचं शिखर दाखवलं पण या सिनेमांनंतर मात्र त्यांचे सिनेमे फ्लॉप ठरले. त्यांनी ‘तेरे लिए’, ‘किडनॅप’, ‘मेरे यार की शादी है’, ‘ऑपरेशन परिंदे’ आणि ‘अजब गजब लव्ह’ यांसारख्या शानदार चित्रपटांचे दिग्दर्शनही केले होते. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.