कोमल दामुद्रे
गणेश चतुर्थीला अवघे काही दिवस उरले असून अनेक मोठ्या मंडळांच्या गणपतींचे आगमन झाले आहे.
चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या राजाचे आगमन झाले आहे. चिंतामणीच्या आगमनाला मोठ्या प्रमाणात भाविकांनी हजेरी लावली होती.
करी रोडच्या मानाच्या राजाचे आगमन झाले आहे. बाप्पाची मूर्ती शंकराच्या प्रतिमेची मूर्ती आहे.
मध्य भायकखळ्याच्या राजाचे आगमन झाले आहे. बाप्पाचे आगमन ढोल ताशांच्या गजरात झाले आहे.
कुलाब्याचा राजा युवराजाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले आहे. कुलाब्याचा राजा हनुमानावर बसला आहे.
परळचा राज्याचा हा मुंबईतील मानाचा गणपती आहे. भारताला स्वातंत्र्य मिळालेल्या वर्षापासून हा गणपती विराजमान होतो.
फोर्टाचा महागणपतीचे आगमनाला मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. बाप्पाच्या मागे हनुमान उभा आहे.
लालबागचा राजाच्या दर्शनाला जगभरातून लोक येत असतात. लालबागच्या राजाची मूर्ती ज्या ठिकाणी विराजमान होते त्याच ठिकाणी तयार होते.
मुंबईतील गणेश गल्लीतील राजा मानाचा गणपती आहे. विशेष म्हणजे, या राजाचा देखावा बघण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.