Adipurush Review Saam Tv
मनोरंजन बातम्या

Adipurush Review: दमदार अभिनय, उत्तम कथा पण व्हिएफएक्समध्ये ठरला अपयशी, पण...असा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’...

Prabhas Film Review: अप्रतिम सिनेमॅटोग्राफी, मुख्यतः बॅक ग्राऊंड म्युझिक, व्हिज्युअल, ग्राफिक्ससोबत अनेक सीन्स पाहून अंगावर शहारे आले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Adipurush Review: ज्या क्षणाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते, अखेर आज तो क्षण अखेर आला. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जूनला प्रदर्शित झाला आहे. अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेला चित्रपट नेमका कसा आहे, चला तर जाणून घेऊया चित्रपटाचा रिव्ह्यू...

चित्रपटाला मिळालेल्या पहिल्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद आहेत, नेटिझन्सने प्रभासचा अभिनय पाहून त्याचे कौतुक केले आहे. अनेक युजर्सने सोशल मीडियावर, “आदिपुरुष मूव्ही रिव्ह्यू: अप्रतिम सिनेमॅटोग्राफी, मुख्यतः बॅक ग्राऊंड म्युझिक, व्हिज्युअल, ग्राफिक्ससोबत अनेक सीन्स पाहून अंगावर शहारे आले. प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान सोबत सर्वांनीच उत्तम भूमिका केली.”

चित्रपटाची कथा

चित्रपटाची कथा रामायणातील अरण्यकंडमसोबत संबंधित आहे, ज्या ठिकाणी रावणाने सीतेचे अपहरण केले होते, तेथील कथा दाखवण्यात आली आहे. प्रभू श्रीराम रावणाच्या मागे जातात आणि सीतेला आपल्या सोबत घेऊन येतात. चित्रपटाची कथा जरी सारखीच असली तरी, निर्मात्यांनी कथेतील पात्रांची नावे वेगळ्या पद्धतीने वापरले.

सोशल मीडियावर प्रभासच्या चित्रपटाची खूपच क्रेझ असते. अनेकांनी चित्रपट पाहताना, चित्रपट झाल्यानंतरदेखील ‘जय श्री राम’च्या घोषणा देत थिएटरमध्ये जयघोष केला. चित्रपटातील सीन्स प्रेक्षकांना खूपच आवडले असून प्रभासची एन्ट्री प्रेक्षकांना फारच भावली आहे. प्रभासचा ॲक्शन सिक्वेन्स पाहून चाहत्यांनी शिट्ट्यांसह, टाळ्यांचा कडकडाट झाला.

‘आदिपुरुष’ हा चित्रपटनसून प्रेक्षकांच्या भावना असल्याच्या अनेकांचे मत आहे. प्रेक्षकांनी चित्रपटाच्या पटकथेला आणि म्युझिक्सला फारच चांगला प्रतिसाद दिला आहे. चाहत्यांना पुर्वार्ध फारच आवडला असून सेकेंड हाफमधील कथा जरा ओढण्याचा प्रयत्न केला आहे.

चित्रपटातील अनेक दृश्ये पाहून प्रेक्षकांना बाहुबलीतील प्रभासची आठवण झाली आहे. ‘आदिपुरुष’मध्ये प्रभासने प्रभू रामाच्या वडिलांची भूमिका साकारली आहे, तर बाहुबलीमध्ये देखील त्याने वडिलांची आणि मुलाची भूमिका साकरली. आता रामसोबत राजा दशरथच्या भूमिकेत प्रभासला पाहून प्रेक्षकांनी पुन्हा एकदा त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. प्रभासच्या भूमिकेत एक सकारात्मक पैलू असून त्याला मिळालेल्या मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या भूमिकेला त्याने न्याय देण्याचा प्रयत्न केला.

तर इतर अभिनेत्याच्या भूमिकेबद्दल बोलायचे तर, सीताची भूमिका क्रिती सेनॉनने साकारली आहे. क्रिती सेनॉनने चित्रपटात उत्कृष्ट अभिनय करत नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. अपेक्षेपेक्षा जास्त चांगला अभिनय केल्याने सोशल मीडियावर तिचे कौतुक होतंय. चित्रपटाच्या घोषणा झाल्यापासून ट्रोल होत असलेला रावण चित्रपटातही सपशेल अपयशी ठरला. चित्रपटात सैफ अली खाननं लंकेश उर्फ ​​रावणचे पात्र साकारले. त्याने प्रेक्षकांना खुर्चिवर खिळवण्यासाठी अपयशी ठरला.

आदिपुरुष चित्रपटात काही नकारात्मक बाजू देखील आहेत. नेटकऱ्यांच्या मते, चित्रपटाचं व्हिएफएक्स अजून सुधारता आलं असतं, पण निर्मात्यांनीही आणि दिग्दर्शकांनीही त्यात सुधारणा केली नाही. अनेक व्हिएफएक्समधील पात्र हे अक्षरश: कार्टून सारखी दिसत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी चित्रपटाला आधुनिक युगातील रामायण अशी उपमा दिली. अनेक नेटकऱ्यांच्या मते, चित्रपटाला कमाईच्या बाबतीत संधी द्यायला हवी. जरी इतकी ट्रोलिंग होत असली तरी, चित्रपटाची फक्त थिएटर्समध्येच नाही तर सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा सुरू आहे.

चित्रपटात प्रमुख भूमिकेत प्रभास प्रभु श्री रामांच्या, क्रिती सेनॉन माता सीतेच्या तर, सनी सिंग लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहे. सोबतच देवदत्त नागे हनुमानाच्या तर, सैफ अली खान रावणाची व्यक्तीरेखा साकारतोय. चित्रपटातील कलाकारांनी ही तगड मानधन घेतले आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच कोट्यावधींची कमाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT