Mahesh Manjrekar And Shivaji Satam In KHC: ही दोस्ती तुटायची नाय..., ‘कोण होणार करोडपती’ मध्ये मांजरेकर आणि शिवाजी साटम यांनी केली एकमेकांची पोलखोल

Kon Honar Crorepati Latest Update: शनिवारच्या विशेष भागात सचिन खेडेकर, महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम यांच्या मैत्रीचे किस्से ऐकायला मिळणार आहेत.
Mahesh Manjrekar And Shivaji Satam In KHC
Mahesh Manjrekar And Shivaji Satam In KHCInstagram
Published On

Kon Honar Crorepati Special Episode Updates: सध्या मराठी टेलिव्हिजनवर ‘कोण होणार करोडपती’ हा शो कमालीचा चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या शो ची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे. या शो च्या होस्टिंगची जबाबदारी सचिन खेडेकर यांच्याकडे आहे. नुकताच या आठवड्यातील ‘विशेष भाग’ चा टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

या शेअर करण्यात आलेल्या टीझरमध्ये अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि अभिनेते शिवाजी साटम हे ज्येष्ठ कलाकार हजेरी लावणार आहेत. येत्या १६ जूनच्या अर्थात शनिवारच्या विशेष भागात सचिन खेडेकर, महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम यांच्या मैत्रीचे किस्से ऐकायला मिळणार आहेत.

शनिवारच्या विशेष भागात महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम हे दोघेही कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (CPAA) या संस्थेकरिता खेळणार आहेत. यावेळी हे मैत्रीचं त्रिकुट पहिल्यांदा झालेली भेट ते आत्तापर्यंत एकत्र केलेली सगळी कामे यांबद्दलचे किस्से प्रेक्षकांना पाहायला मिळतील. महेश मांजरेकर, शिवाजी साटम आणि सचिन खेडेकर यांच्या मैत्रीचे अनोखे बंध आपल्याला या विशेष भागातून पाहायला मिळणार आहेत.

सचिन खेडेकर, महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम यांच्या एकत्रित रंगलेले अनेक किस्से यावेळी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. शिवाजी साटम यांनी चाहत्यांना त्यांचं पहिले नाटक संगीत वरदान यावेळी ते प्रेक्षकांना कसे सामोरे गेले हा किस्सा सांगितला. सोबतच यावेळी शिवाजी साटम यांनी त्यांचा सर्वाधिक प्रसिद्ध असलेला डायलॉग ‘दया कुछ गडबड है’ हा डायलॉग पण बोलले. शोमध्ये झालेली धमालमस्ती प्रेक्षकांना येत्या शनिवारी १७ जूनला सोनी मराठीवर पाहता येणार आहे.

महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम हे कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (CPAA) या संस्थेसाठी ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत. महेश मांजरेकर स्वतः कॅन्सरच्या आजारातून बरे होऊन आले आहेत, तर कॅन्सर पेशंट्सना कोणत्याही प्रकारे जी काही मदत करता येईल, त्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेणार, असे त्यांनी सांगितले...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com