Mithun Chakraborty Birthday: एकेकाळी नक्षलवादी असणाऱ्या मिथुनदाचा असा होता, फिल्मी प्रवास...

Mithun Chakraborty Life Untold Story: अभिनयक्षेत्रात डेब्यू करण्यापूर्वी मिथुन यांच्या मनात आत्महत्येसारखा विचार आला होता. नेमका अभिनेत्याच्या मनात हा विचार का आला ?
Mithun Chakraborty Life Untold Story
Mithun Chakraborty Life Untold StorySaam Tv
Published On

Mithun Chakraborty Life Journey: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा आज (१६ जून) ७३ वा वाढदिवस आहे. १९७६ मध्ये 'मृगया' चित्रपटातून बॉलिवूड मध्ये डेब्यू करणाऱ्या अभिनेत्याला त्या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला कमावणारा हा पहिला चित्रपट ठरला होता. अभिनयक्षेत्रात डेब्यू करण्यापूर्वी मिथुन यांच्या मनात आत्महत्येसारखा विचार आला होता. नेमका अभिनेत्याच्या मनात हा विचार का आला ?, चला तर जाणून घेऊया त्यांच्या वाढदिवसानिमित्त...

Mithun Chakraborty Life Untold Story
Mugdha Vaishampayan & Prathamesh Laghate: आमचं ठरलंय! मुग्धा-प्रथमेशचे सूर जुळले; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली प्रेमाची कबुली

मिथुन चक्रवर्ती यांचं ‘आय एम अ डिस्को डान्सर’ हे गाणं ऐकलं असेल. हे गाणं आहे, ‘डिस्को डान्सर’ या चित्रपटातील. या गाण्यामुळे अभिनेत्याला प्रसिद्धी मिळाली. २०११ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत, मिथुनने चित्रपट जगतातील त्याच्या 35 वर्षांच्या प्रवासाबद्दल सांगितले आणि यावेळी त्याने या मुलाखतीत त्याच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. मिथुन चक्रवर्ती म्हणतात, 'मी माझ्या संघर्षाच्या दिवसांबद्दल बोलणार नाही, कारण त्यामुळे अनेकांचे मनोधैर्य खचले जाईल. प्रत्येकजण संघर्ष करतो, परंतु माझा संघर्ष खूपच मोठा होता. (Bollywood Actor)

आपल्या मेहनतीने, जिद्दीने आणि कर्तृत्वामुळे मोठे झालेल्या मिथुन चक्रवर्तींचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. मनोरंजन विश्वात आल्यानंतर कोट्यावधी कमावणारे मिथुन चक्रवर्ती पुर्वी नक्षलवादी होते. १६ जून १९५० रोजी कोलकात्यात जन्मलेल्या मिथुन चक्रवर्तींनी बीएससीचे शिक्षण पूर्ण करत पुण्यातून फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधून पदवी प्राप्त केली. आणि यानंतर ते नक्षलवाद्यांच्या गटात सामील झाले आणि स्वतः देखील नक्षलवादी बनले होते. (Entertainment News)

Mithun Chakraborty Life Untold Story
Amol Kolhe Share Post: साक्षात महाराज दिसले... अमोल कोल्हे यांच्या फोटोवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

एका नक्षल चळवळीत मिथून यांच्या भावाचा विजेचा झटका लागून त्यांचा मृत्यू झाला होता. पूर्णपणे खचलेल्या अभिनेत्याला आपल्या कुटुंबाची फार काळजी वाटत होती. आपल्या कुटुंबाच्या काळजीपोटी अभिनेत्याने चित्रपटसृष्टीत आपला हात आजमावण्याचा विचार केला होता. मिथुन यांच्यासाठी चित्रपटसृष्टीतीलही मार्ग सोपा नव्हता. अभिनयात काम मिळवण्यापूर्वी त्यांना फूटपाथवर देखील रात्र काढावी लागली होती. कधी होस्टेलसमोर तर कधी, गार्डन्समध्ये ते झोपले होते.

मिथुन एका मुलाखतीत म्हणाले, “अनेकजण आज संघर्ष करत आहेत, त्यांना माझा संघर्ष सांगून त्यांचे मन नाही तोडायचे. एक वेळ अशी आली की, मला असं काही करता येणार नाही असं वाटायला लागलं, मला वाटलं की आत्महत्या तर करायचीच नाही. याची अनेक कारणे होती.”

८० च्या दशकात मिथुन चक्रवर्ती यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयामुळे इंडस्ट्री गाजवली. नेहमीच सुपरहिट ठरणाऱ्या मिथुन यांचे काही काळ सतत चित्रपट फ्लॉप ठरले होते. मिथुन यांचे चित्रपट १९९३ ते १९९८ च्या काळामध्ये अनेक चित्रपट सतत फ्लॉप ठरले होते. चित्रपट इतके फ्लॉप ठरले असले तरी, त्यांच्या प्रसिद्धीवर कोणताच फरक पडला नव्हता. (Bollywood Film)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com