Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Box Office Collection : 'बाहुबली' की 'थामा' संडेला कोणी मारली बाजी? 'द ताज स्टोरी'ने कमावले फक्त 'इतके' कोटी

Baahubali vs The Taj Story : रविवारी 'बाहुबली' आणि 'थामा' चित्रपटाने किती कोटींचा व्यवसाय केला जाणून घेऊयात. तसेच परेश रावल यांच्या 'द ताज स्टोरी'च्या कमाईत घसरण झाली आहे.

Shreya Maskar

सध्या बॉक्स ऑफिसवर 'बाहुबली' आणि 'थामा' एकमेकांना टक्कर देत आहेत.

परेश रावल यांचा 'द ताज स्टोरी' चित्रपट 31 ऑक्टोबरला रिलीज झाला आहे.

प्रभासचा 'बाहुबली' बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे.

31 ऑक्टोबरला बॉक्स ऑफिसवर दोन चित्रपट रिलीज झाले आहेत. यात परेश रावल यांचा 'द ताज स्टोरी' आणि प्रभासचा 'बाहुबली' या चित्रपटांचा समावेश आहे. 'थामा' सिनेमा 'बाहुबली'ला तगडी टक्कर देताना दिसत आहे. तसेच याआधी बॉक्स ऑफिसवर 'एक दीवाने की दीवानीयत' आणि 'कांतारा चॅप्टर १' देखील रिलीज झाला आहे. एकंदर विकेंडला रविवारी कोणत्या चित्रपटाने बाजी मारली जाणून घेऊयात. चारही सिनेमांचे कलेक्शन जाणून घेऊयात.

'द ताज स्टोरी' बॉक्स ऑफिस कलेक्शन

सॅकनिल्कच्या मीडिया रिपोर्टनुसार, 'द ताज स्टोरी'ने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी 2.21 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर ओपनिंग डेला 1 कोटी कमावले आहेत. तर दुसऱ्या दिवशी 1.9 कोटींचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाने वीकेंडला एकूण 5.11 कोटी रुपयांची कमाई केली.

'बाहुबली द एपिक' बॉक्स ऑफिस कलेक्शन

सॅकनिल्कच्या मीडिया रिपोर्टनुसार,'बाहुबली द एपिक' चित्रपटाने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी रविवारी 6.30 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाचे एकूण कलेक्शन तब्बल 24.35 कोटी रुपये झाले आहे.

'थामा' बॉक्स ऑफिस कलेक्शन

आयुष्मान खुराना, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि रश्मिका मंदाना यांच्या 'थामा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 120 कोटींची कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाने दुसऱ्या रविवारी 4.25 कोटी कमावले आहेत.

'एक दीवाने की दीवानीयत' बॉक्स ऑफिस कलेक्शन

'एक दीवाने की दीवानीयत' चित्रपटाने 60 कोटींच्यावर कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाने रविवारी 3.75 कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे चित्रपटाचे एकूण कलेक्शन 64.40 झाले आहे.

'कांतारा चॅप्टर १' बॉक्स ऑफिस कलेक्शन

ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर १' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 610 कोटी कमावले आहेत. सॅकनिल्कच्या मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाने रविवारी 3.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT