Politics : आगामी निवडणुकीपूर्वी बाहुबली नेत्याला जोरदार झटका, मुलाने स्थापन केला वेगळा पक्ष

Political News : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्या मुलाला, तेज प्रताप यांना पक्षातून बाहेर काढले होते. आता तेज प्रताप यांनी जनशक्ती जनता दल हा नवा पक्ष स्थापन केला आहे.
tej pratap yadav
tej pratap yadavx
Published On
Summary
  • लालू यादवांचे पुत्र तेज प्रताप यांनी नवा पक्ष स्थापन केला.

  • त्यांच्या नव्या पक्षाचे नाव जनशक्ती जनता दल असे आहे.

  • पक्षाला ब्लॅक बोर्ड हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे.

Politics News : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना मोठा धक्का बसला आहे. लालू याचे मोठे पुत्र तेज प्रताप यादव यांनी त्यांच्या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. तेज प्रताप यांच्या नवीन पक्षाचे नाव जनशक्ती जनता दल असे आहे. निवडणूक आयोगाने पक्षाच्या निवडणूक चिन्हाचे वाटप देखील केले आहे. तेज प्रताप यांच्या पक्षाला ब्लॅक बोर्ड हे चिन्ह देण्यात आले आहे. पक्षाच्या पोस्टरमधून तेज प्रताप यांचे वडील लालू यादव यांना वगळण्यात आले आहे.

तेज प्रताप यादव यांच्या जनशक्ती जनता दल या नवीन पक्षाच्या पोस्टमध्ये महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राम मनोहर लोहिया, लोकनायक जयप्रकाश नारायण आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांचा समावेश करण्यात आला आहे. तेज प्रताप यांनी राजद पक्ष सोडल्यानंतर वडील लालू प्रसाद यादव आणि आई राबडी देवी यांच्याबद्दल वारंवार आदर व्यक्त केला असला, तरी पोस्टरवर त्या दोघांचे नाव वगळले आहे.

tej pratap yadav
Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

काही महिन्यापूर्वी लालू प्रसाद यादव यांच्या घरातील आणि पक्षातील वाद समोर आला होता. लालू यांचे पुत्र तेज प्रताप यादव यांचे अनुष्का यादव यांच्यासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर लालू प्रसाद यांनी तेज प्रताप यांच्यावर कारवाई केली. त्यांनी तेज यांना राजद पक्षातून काढून टाकले होते.

tej pratap yadav
Pune Fire : पुण्यात भीषण दुर्घटना! १४ मजली इमारतीत आग, सिलेंडरचा स्फोट, १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, ५ जखमी

आगामी बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी, तेज प्रताप यादव यांनी एका नवीन पक्षाद्वारे त्यांची राजकीय कारकीर्द पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी, तेज प्रताप यांना त्यांचे वडील लालू प्रसाद यादव यांनी राष्ट्रीय जनता दल म्हणजेच राजद पक्षातून सहा वर्षांसाठी काढून टाकले होते. त्यामुळे तेज प्रताप यांनी नवीन पक्ष स्थापन केला.

tej pratap yadav
MNS : प्ले ग्रुपमधील चिमुरड्याला मारहाण प्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com