nivin pauly TWITTER
मनोरंजन बातम्या

Malyalam Actor Nivin Pauly Booked For Rape : मल्याळी अभिनेता निविन पॉलीवर लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mollywood Rape Case Update : हेम समितीने सादर केलेल्या अहवालावर विविध क्षेत्रांतून प्रतिक्रिया येत असतानाच आता मॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता निविन पॉली याच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. केरळच्या एर्नाकुलममधील ओन्नुकल पोलिस ठाण्यात एक ४० वर्षीय महिलेच्या तक्रारीवरुन अभिनेता निविन याच्यासह इतर ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, या आरोपींमध्ये एका श्रेया नावाच्या महिलेचाही समावेश असून नोव्हेंबेर - २०२३ मध्ये ही घटना घडली आहे. ही तक्रारदार महिलेला युरोपमध्ये नोकरीची ऑफर आरोपी श्रेयाने दिली होती. मात्र सदर महिलेने ही काम न केल्याने श्रेया हिने पैसे परत मागितले. त्या नंतर श्रेयाने महिलेला चित्रपटात काम करण्याची ऑफर देऊन अमली पदार्थ देत तिचे लैंगिक शोषण करण्यात आले, असे तक्रारदार महिलेचे म्हणणे आहे.

या प्रकरणी एके सुनील, बिनू, बशीर, कुट्टन यांच्यावरही गुन्हे दाखल असून निविन हा सहावा आरोपी आहे. अभिनेता निविन याने दुबई येथे आपल्यावर बलात्कार केला असल्याचे पीडित महिलेचे म्हणणे आहे.

तर, न्यायमूर्ती हेमा समितीच्या अहवालानंतर मल्याळम चित्रपट सृष्टीमधील महिलांवरील लैंगिक गैरवर्तनाच्या तक्रारी हाताळण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून या प्रकरणाची चौकशी होणार आहे. ऑगस्ट महिन्यात प्रकाशित झालेल्या या अहवालात मल्याळम चित्रपट सृष्टीमधील लैंगिक गैरवर्तनावर भाष्य करण्यात आले आहे.

अभिनेता निविन याने आरोप फेटाळले

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासांनी अभिनेता निविन पॉली याने आपल्या X अकाऊंटवरून पोस्ट करत त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

आपल्या पोस्टमधून त्याने म्हंटले आहे की, ''माझ्याबद्दल खोटी बातमी समोर आली असून हे आरोप निराधार आहेत, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. ही आरोप निराधार सिद्ध करण्यासाठी मी सर्वोतपरी प्रयत्न करणार आहे.''

यानंतर निविन याने मंगळवारी पत्रकार परिषदेचेही आयोजन केले होते. यात त्याने सदर तक्रारदार महिलेवर मानहानीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT