Poonam Pandey SAAM TV
मनोरंजन बातम्या

Poonam Pandey : 'रामलीला'मध्ये पूनम पांडेची एन्ट्री; हिंदू संघटना भडकल्या, तीव्र विरोध

Poonam Pandey-Delhi Ramlila : अभिनेत्री पूनम पांडे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिच्या 'रामलीला'मधील सहभागामुळे हिंदू संघटनेने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Shreya Maskar

दिल्लीत होणाऱ्या 'रामलीला'मध्ये बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे दिसणार आहे.

पूनम पांडे 'रामलीला'मध्ये मंदोदरीची भूमिका साकारणार आहे.

पूनम पांडेच्या 'रामलीला'मधील एन्ट्रीवर हिंदू संघटनांकडून विरोध झाला आहे.

आपल्या अतरंगी स्टाइल आणि वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असलेली अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.दरवर्षी नवरात्री उत्सवात दिल्लीत लवकुश रामलीला केली जाते. यंदा या 'रामलीला'मध्ये अभिनेत्री पूनम पांडे भाग घेणार आहे. ती रावणाच्या पत्नीची म्हणजेच मदोदरीची भूमिका साकारणार आहे. याची घोषणा अभिनेत्रीने केली. मात्र अभिनेत्रीच्या 'रामलीला'मधील प्रवेशामुळे हिंदू संघटनेने विरोध दर्शवला आहे.

इंद्रप्रस्थ विश्व हिंदू परिषदेचे दिल्ली राज्य सचिव सुरेंद्र गुप्ता यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, "रामलीलाचे सादरीकरण भारतीय संस्कृती आणि परंपरा प्रतिबिंबित करते. त्यात ग्लॅमरचा समावेश करणे परंपरा आणि शिष्टाचाराच्या विरुद्ध आहे." सुरेंद्र गुप्ता यांनी लवकुश रामलीला समितीला पत्र लिहून या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.

लवकुश रामलीला समितीचे अध्यक्ष अर्जुन कुमार म्हणतात की, "आम्ही महिला सक्षमीकरणाबद्दल बोलतो. मंदोदरीचे पात्र रावणाला वाईटापासून रोखण्यासाठी आहे. जर पूनम पांडे ही भूमिका साकारत असेल तर त्याचा तिच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होईल." पुढे समिती म्हणाली की, "पूर्वी जे लोक डाकू होते ते आज संसदेत पोहोचले.

'रामलीला'मध्ये अभिनेता आर्य बब्बर रावणाची भूमिका साकारणार आहे. 22 सप्टेंबर ते 3ऑक्टोबर या कालावधीत दिल्लीच्या रामलीला मैदानावर रामलीला होणार आहे. ज्यामध्ये अनेक प्रसिद्ध कलाकार विविध भूमिकांमध्ये दिसतील.

पूनम पांडे कोण?

पूनम पांडेने 2013 मध्ये 'नशा' चित्रपटातून आपल्या करिअरला सुरूवात केली. त्याआधी तिने मॉडेलिंगमध्ये करिअर केले आहे. ती अनेक वेळा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिने स्वतःच्या मृत्यूची बातमी पसरवली होती. ज्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली. तिचे व्हिडीओ आणि फोटो कायम चर्चेत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai : अलिबाग, गोव्यापेक्षाही सुंदर आहे नवी मुंबईतील 'हा' समुद्रकिनारा

T20 World Cup 2026 Schedule : टी २० वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर; या दिवशी होणार क्रिकेटच्या महाकुंभमेळ्याला सुरुवात, रोहित शर्माकडं मोठी जबाबदारी

Green Chili Pickle: गावरान पद्धतीने बनवा हिरव्या मिरचीचं लोणचं, वर्षानुवर्षे टिकून राहील चव

Maharashtra Live News Update : महात्मा फुलेवाडा आमच्या ताब्यात द्या; राज्य सरकारला समता परिषदेचे पत्र

Shocking : लग्नाला सुट्टी मिळाली नाही; लग्नाच्या एक दिवसाआधी ऑडिटरने आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT