Hemant Dhome Shared Sharad Pawar Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hemant Dhome News : "साहेब आपली क्षमता आणि चिकाटी आम्हा तरूणांना..."; हेमंत ढोमेची शरद पवारांसाठीची पोस्ट चर्चेत

Hemant Dhome Shared Sharad Pawar Post : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे सर्वच त्यांच्या तब्येतीची विचारपूस करीत आहेत. मराठमोळा अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेनेही त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.

Chetan Bodke

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची काल अचानक सभेतच तब्येत बिघडली होती. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दिवसभर रविवारी सभा होत्या. पण त्यांची बारामतीतील सभेत अचानक तब्येत बिघडली. त्यामुळे आजचे त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. त्यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे सर्वच त्यांच्या तब्येतीची विचारपूस करीत आहेत. अशातच मराठमोळा अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेनेही त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.

हेमंत ढोमेने सोशल मीडियावर पोस्ट लिहित मोजक्या शब्दात त्यांची तब्येतीची काळजी केली आहे. अभिनेत्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "आदरणीय साहेब… आपली मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी आम्हा तरूणांना देखील थक्क करणारी आहे… पण कृपया स्वतःची काळजी घ्या… तब्येत जपा… खंडोबा आपणांस लवकरात लवकर बरे करो…" अभिनेत्याने एक्सवर त्यांचा फोटो पोस्ट करत ही पोस्ट शेअर केलेली आहे. (Social Media)

हेमंतच्या ह्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी शरद पवार लवकरात लवकर बरे व्हावे अशी कमेंट केली आहे. उद्या (७ मे) तिसऱ्या टप्प्यात राज्यातील ११ जागांसह देशातील ९४ मतदार संघात मतदान होणार आहे. लोकसभेच्या निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये राज्यामध्ये, रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदार संघात निवडणूका होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Ayushman Bharat: ५ लाख नाही तर १० लाखांपर्यंत मोफत उपचार; कोणत्या कुटुंबांना होणार फायदा? वाचा सविस्तर माहिती

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, मेट्रोचं जाळं विस्तारणार; 31 किमी लांबीच्या २ मार्गिका अन् २८ स्थानके

SCROLL FOR NEXT