Kangana Ranaut React PM Modi Garba Song Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut Reacted On Garba Song: “खूपच सुंदर....” पीएम मोदींनी लिहिलेल्या गरबा गाण्याची कंगना झाली फॅन! तुम्ही गाणं ऐकलंत का?

Kangana Ranaut React PM Modi Garba Song: सध्या सोशल मीडियासह सर्वत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘गरबो’ गाण्याची चर्चा होत आहे. गाण्याला फक्त नेटकऱ्यांनीच नाही तर बॉलिवूड सेलिब्रिटींनीही पाठिंबा दिला.

Chetan Bodke

Kangana Ranaut Reacted On PM Modi Garba Song

सध्या सोशल मीडियासह सर्वत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘गरबो’ गाण्याची चर्चा होत आहे. गाण्याचे संगीतकार तनिष्क बाग तर गायिका ध्वनी भानुशाली यांच्या ‘गरबो’ नावाच्या नवीन गरबा गाण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गीतकार बनले आहेत. गाण्याची निर्मिती जॅकी भगनानी यांनी केली असून ‘डायनॅमिक म्युझिक लेबल जस्ट म्युझिक’ने गाणं रिलीज केलंय. गाण्याला अवघ्या काही तासांतच लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. सध्या सोशल मीडियावर पंगा गर्ल कंगना रनौतने केलेल्या कौतुकाची चर्चा होतेय.

कंगनाने सोशल मीडिया ट्वीटर एक्सवर पीएम नरेंद्र मोदींनी लिहिलेल्या या गाण्याचे कौतुक केले आहे. कंगनाने केलेल्या ट्वीटची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. दरम्यान कंगनाने पोस्टमध्ये लिहिलंय की, “किती सुंदर आहे. अटलजींच्या कविता असो किंवा नरेंद्र मोदीजींची गाणी/कविता आणि कथा... आपल्या नायकांना सौंदर्य आणि कलेत रमलेले पाहून हृदयाला आनंद होतो. #Navratri2023 गरबा सर्व कलाकारांसाठी खूप प्रेरणादायी असतो.” सध्या अभिनेत्रीने केलेल्या कौतुकाची सर्वत्र चर्चा होत आहे.

काल गाण्याची गायिका ध्वनी भानुशालीने पीएम मोदींनी लिहिलेल्या गरबा गाण्याचा म्युझिक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. अभिनेत्रीने पोस्टमध्ये लिहिले की, “प्रिय नरेंद्र मोदी जी, तनिष्क बागची आणि तुम्ही लिहिलेला गरबा मला खूप आवडला. आम्हाला नवीन संगीत असलेले गाणे बनवायचे होते. त्याची आम्ही निर्मिती केली आहे.”

तर या व्हिडीओवर पंतप्रधानांनी ट्वीट करत गाण्याच्या टीमचे आभार मानले. ध्वनी भानुशालीच्या ट्वीटला रिट्वीट करत पीएम मोदींनी लिहिले की, “ध्वनी भानुशाली, तनिष्क बागची आणि जस्ट म्युझिकच्या टीमचे आभार. मी वर्षांपूर्वी लिहिलेल्या गरब्याच्या गाण्याचे सुंदर सादरीकरणासाठी! अनेक आठवणींना उजाळा दिला. मी बर्‍याच वर्षांपासून लिहिले नाही, परंतु गेल्या काही दिवसात मी एक नवीन गरबा लिहू शकलो आहे, जो मी नवरात्रीच्या काळात शेअर करेन.”

हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. काहींनी व्हिडिओ क्रेडिट्समध्ये पंतप्रधान मोदींचे नाव पाहून आश्चर्य व्यक्त केले आणि त्यांच्या योगदानाचे कौतुकही केलं, तर काहींनी ’वाह मोदी जी वाह’ असे उद्गार काढत त्यांचे कौतुक केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : पुण्यात थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT