Pinga Ga Pori Pinga Video SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pinga Ga Pori Pinga Video : कुणीतरी येणार येणार गं! प्रेरणा होणार आई, 'पिंगा गर्ल्स'चा आनंद गगनात मावेना

Pinga Ga Pori Pinga Update : 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत आनंदाचा क्षण आला आहे. लवकरच 'पिंगा गर्ल्स'मध्ये नवीन पाहुण्याचे स्वागत होणार आहे. मालिकेचे अपडेट जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'पिंगा गर्ल्स'च्या आयुष्यात नवा पाहुणा येणार आहे.

'पिंगा गर्ल्स'ची सदस्य प्रेरणा लवकरच आई होणार आहे.

'पिंगा गर्ल्स' नवीन पाहुण्याच्या स्वागतासाठी खूपच उत्सुक आहेत.

कलर्स मराठी वाहिनीवरील 'पिंगा गं पोरी पिंगा' (Pinga Ga Pori Pinga) मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. मालिकेत आता नवीन वळण आले आहे. 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत नेहमीच आधुनिक स्त्रियांचा आत्मविश्वास, त्यांची स्वप्नं आणि मैत्री दाखवली गेली आहे. आता पिंगा गर्ल्सच्या आयुष्यात नवा आनंद येणार आहे. सुखाची चाहूल लागली आहे. पिंगा गर्ल्सपैकी एक त्यांची मैत्रीण प्रेरणा लवकरच आई होणार आहे.

स्वतःच्या करिअरमध्ये पुढे गेलेली, आत्मनिर्भर आणि स्वप्नाळू प्रेरणाला आता मातृत्वाचे सुख लाभणार आहे. तिने दिलेल्या या गोड बातमीमुळे बाकीच्या सगळ्या मैत्रिणींच्या आनंदाला उधाण आले आहे. या सर्वात इंदू वल्लरीला म्हणते "प्रेरणेला बाळ होणार, पण तुला नाही म्हणजे काहीतरी कमी आहे तुझ्यात." या बोलण्यावरून वल्लरी आणि मनोज खूप अस्वस्थ होतात. त्यांच्या नात्यावर या गोष्टीचा कोणता परिणाम होणार? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत आता आनंदाचे वळण आले आहे. या सगळ्यात पिंगा गर्ल्स पुन्हा एकत्र येतात. प्रेरणाच्या या नव्या प्रवासात तिच्या पाठीशी उभं राहतात. एकमेकींना दिलेला आधार आणि खरी मैत्री यामुळे मालिकेत पुन्हा एकदा भावनिक रंग भरणार आहेत. सर्व मैत्रिणी मिळून प्रेरणा आई होणार असल्याचा आनंद साजरा करतात.

दुसरीकडे मिठू अचानक परतल्याने सगळ्यांनाच खूप आनंद होतो. एका बाजूला प्रेरणाचं मातृत्व, दुसऱ्या बाजूला वल्लरीची लढाई आणि मिठूचं पुनरागमन या सगळ्यामुळे पिंगा गर्ल्सचे पुढील भाग भावनिक आणि प्रेक्षकांना स्क्रीनसमोर खिळवून ठेवणारे असणार आहे. तसेच मिठूला तेजा आणि हर्षितच्या नात्याबद्दल समजताच ती कशी प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिका कलर्स मराठीवर संध्याकाळी 7.30 वाजता पाहायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चॅट्स- व्हिडिओ बघितले, चुपके-चुपकेवालं अफेअर समजलं; बँकेत मॅनेजर असलेल्या नवऱ्याला बायकोनं तुडव तुडव तुडवलं

Goa Film Festival: गोवा फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी सिनेमाचा डंका, 'या' दोन चित्रपटांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक

Shepuchi Bhaji Recipe: मुगाची डाळ घालून बनवा शेपूची भाजी; नाक मुरडणारे पण चवीचवीनं खातील

Skin Care: हिवाळ्यात चेहरा साबणने धुण्याची सवय आहे? मग, होऊ शकतो 'हा' गंभीर परिणाम

Apple कडून मोठा धमाका होणार; नव्या वर्षांत महत्वाची घोषणा करणार

SCROLL FOR NEXT