Abhishek Bachchan-Filmfare Awards
Abhishek BachchanSAAM TV

Abhishek Bachchan : पैसे देऊन फिल्मफेअर पुरस्कार घेतल्याची टीका; अभिषेक बच्चनने ट्रोलर्सची केली बोलती बंद, म्हणाला...

Abhishek Bachchan-Filmfare Awards : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनला नुकताच फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. मात्र त्याने हा पुरस्कार खरेदी करून आणि PR करून मिळवला असल्याची टीका त्याच्यावर करण्यात आली आहे.
Published on
Summary

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनला फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अभिषेक बच्चनला 'I Want To Talk' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

अभिषेक बच्चनने पैसे देऊन आणि PR करून पुरस्कार मिळवला, अशी टीका त्याच्यावर केली.

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) सध्या त्याच्या चित्रपटांमुळे चांगलाच चर्चेत आहे. एका मागोमाग एक त्याचे चित्रपट येत आहेत. नुकताच 70 फिल्मफेअर पुरस्कार सोहळा थाटामाटात पार पडला आहे. त्यात अभिषेक बच्चनला 'I Want To Talk' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तब्बल 25 वर्षांनी त्याला हा पुरस्कार मिळाला. पुरस्कारासाठी त्याचे भरपूर कौतुक करण्यात आले. मात्र काहींनी त्याच्यावर टीका देखील केली आहे. त्याने पैसे देऊन PR करून पुरस्कार मिळवला, अशी टीका त्याच्यावर केली.

व्हायरल पोस्ट

"तुम्ही करिअरमध्ये एकही ब्लॉकबस्टर किंवा हिट चित्रपट केला नसला तरी पुरस्कार खरेदी करून आणि PR करून तुम्ही प्रसिद्ध होऊ शकता. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अभिषेक बच्चन. त्याने या वर्षी #IWantToTalk साठी पुरस्कार जिंकला. असा चित्रपट जो काही PAID समीक्षकांशिवाय कोणीही पाहिला नाही आणि आता मला असे सर्व ट्विट दिसत आहेत की 2025 हे त्याचे वर्ष आहे. त्याच्यापेक्षा खूप चांगले कलाकार आहेत जे अधिक ओळख, काम, कौतुक आणि पुरस्कारांना पात्र आहेत. पण अरेरे! त्यांच्याकडे PR बुद्धिमत्ता आणि पैसा नाही."

अभिषेक बच्चन काय म्हणाला?

"मी आजवर कधीही कोणताही पुरस्कार विकत घेतलेला नाही किंवा PR देखील केलेला नाही. फक्त कठोर परिश्रम, कष्ट, घाम आणि अश्रू गाळून हे यश मिळवले आहे. मी जे काही बोलतो किंवा लिहितो त्यावर तुम्ही विश्वास ठेवाल अशी शंका आहे. त्यामुळे तुमचे तोंड बंद करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आणखी कठोर परिश्रम करणे, जेणेकरून भविष्यात पुन्हा कधीही होणाऱ्या कोणत्याही यशावर तुम्हाला शंका येणार नाही. मी तुम्हाला चुकीचे सिद्ध करेन!"

अभिषेक बच्चन फिल्मफेअर पुरस्कार स्वीकारताना खूप भावुक झाला होता. हा पुरस्कार त्याच्या 25 वर्षांच्या मेहनतीचे फळ आहे. पुरस्कार स्वीकारताना त्याने आपल्या कुटुंबाचे आभार मानले. आता चाहते अभिषेक बच्चनच्या आगामी प्रोजेक्टची वाट पाहत आहेत.

Abhishek Bachchan-Filmfare Awards
Bigg Boss 19 : प्रणित मोरेचा स्वॅग लय भारी, बनला 'बिग बॉस'च्या घराचा नवा कॅप्टन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com