Chhaya Kadam: भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार समजल्या जाणाऱ्या ७०व्या फिल्मफेअर अवॉर्ड्स २०२५ मध्ये मराठी अभिनेत्री छाया कदम यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे. त्यांनी ‘लापता लेडीज’ या चित्रपटातील दमदार भूमिकेसाठी हा सन्मान जिंकला.
किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ हा चित्रपट ग्रामीण भारतातील सामाजिक वास्तव, स्त्रियांचं अस्तित्व आणि ओळख या संवेदनशील विषयांवर आधारित आहे. या चित्रपटात छाया कदम यांनी साकारलेली “मंजू” ही व्यक्तिरेखा ठळक आणि भावनांनी भरलेली आहे. एका स्त्रीच्या संघर्षातून, समाजातील स्त्रियांच्या स्थितीचं प्रतिबिंब दाखवणारी ही भूमिका त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरली आहे.
पुरस्कार स्वीकारताना छाया कदम भावुक झाल्या. मंचावर भावना व्यक्त करताना त्यांनी मराठी, हिंदी आणि मालवणी भाषेचा सुरेख संगम साधत प्रेक्षकांना आणि सहकलाकारांना मनापासून धन्यवाद दिले. त्या म्हणाल्या, “मी एका छोट्या गावातून मुंबईत आले. वर्षानुवर्षांच्या मेहनतीनंतर आज या मंचावर उभं राहणं म्हणजे माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा सन्मान आहे. हा पुरस्कार त्या प्रत्येकासाठी आहे जे या क्षेत्रात काम करताना विचार करतात अपना टाईम कब आयेगा. थँक्यू किरण माझ्यावर विश्वास ठवलास आणि या मराठी मुलीला यूपीची मंजूमाई केलस
माधुरी दीक्षितसोबत स्पर्धा
या श्रेणीत छाया कदम यांच्यासोबत माधुरी दीक्षित, शेफाली शाह, रत्ना पाठक शाह आणि तिलोत्तमा शोम अशा नामांकित अभिनेत्रींची स्पर्धा होती. मात्र, छायांच्या प्रामाणिक आणि प्रभावी अभिनयाने त्यांनी सर्वांची मने जिंकत पुरस्कार आपल्या नावावर केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.