Aishwarya Shete SAAM TV
मनोरंजन बातम्या

Aishwarya Shete : जळगावची वल्लरी होणार मुंबईची कॉर्पोरेट स्त्री, 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेतील ऐश्वर्याच्या नव्या लूकनं वेधलं लक्ष

Pinga Ga Pori Pinga : सध्या मराठी अभिनेत्री ऐश्वर्या शेटे 'पिंगा गं पोरी पिंगा' या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आता मालिकेत वल्लरीचा नवा लूक पाहायला मिळणार आहे.

Shreya Maskar

'कलर्स मराठी'वरील 'पिंगा गं पोरी पिंगा' ही मालिका एक नवा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि अल्पावधीतच सर्वांच्या पसंतीस उतरली. मालिकेतील वल्लरी म्हणजेच ऐश्वर्या शेटेने (Aishwarya Shete) आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वल्लरीचा गावाकडचा लूक, भाषा, देहबोली सर्वकाही लक्षवेधी आहे. अशातच आता वल्लरी एका नव्या लूकमध्ये झळकणार आहे. ही मालिका दररोज संध्या. 7:30 वाजता लागते.

गावाकडच्या वल्लरीचा शहरी बाज असलेला कॉर्पोरेट लूक प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा आहे. वल्लरीने कॉर्पोरेट लूकवर सौभाग्याचं लेणं लावल्याने तिला हिणवलं जातंय. वल्लरी शहरात राहत असली तरी गावच्या मातीशी तिची नाळ जोडलेली आहे. आता येणाऱ्या आव्हानाचा वल्लरी कशी सामना करणार, कसा समजाचा दृष्टिकोन बदलणार हे पाहावे लागेल.

'पिंगा गं पोरी पिंगा' (Pinga Ga Pori Pinga) या मालिकेतील आपल्या नव्या लूकबद्दल बोलताना वल्लरी म्हणजेच ऐश्वर्या शेटे म्हणाली, "एक व्यक्तीरेखा उभं करताना महत्त्वाचं असतं ते म्हणजे त्या पात्राचा लूक, त्याची भाषा, देहबोली. 'पिंगा गं पोरी पिंगा' या मालिकेत एकाच पात्राच्या दोन वेगळ्या छटा साकारण्याची संधी मला मिळाली आहे. कॉर्पोरेट लूकमध्ये वावरताना एक वेगळच बळ अंगात संचारलं आहे. कॉर्पोरेटचा रुबाब आणि त्याच्यासोबत गावाकडेचा साधेपणा अशा अनेक गोष्टींचा टच या नव्या लूकला आहे. ऐश्वर्यापेक्षा पूर्णपणे वेगळं पात्र या मालिकेत मी साकारत आहे".

पुढे ऐश्वर्या म्हणाली की, "सुरुवातीला वल्लरी या पात्राबद्दल मी खूप संभ्रमात होते. पण, माझा हा लूक आणि तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. मस्सा, गोंदन या गोष्टी पाहून गावाकडच्या मुलीचं पात्र साकारणं आणि तिकडची दिसणं हे कितपत लोकांना पटणार आहे? आणि कसं दिसणार आहे. असे अनेक प्रश्न पडले होते. पण या लूकने सर्वांच लक्ष वेधून घेतलंय."

शेवटी ऐश्वर्या म्हणाली की, "खानदेशी भाषा शिकण्यासाठी मी खूप मेहनत घेतली. सहनशील, समजूतदार असे वल्लरीचे अनेक गुण शिकण्यासारखे आहेत. खरं सांगायचं तर या मालिकेला एका क्षणात मी होकार दिला होता. कारण खरचं हा पाच मुलींचा पिंगा आहे. पाच वेगवेगळ्या शहरांतून आलेल्या मुली, त्यांची स्वप्न.. पण या सगळ्यात वल्लरी एक वेगळी स्टँड आऊट होते. मला खात्री आहे की, आतापर्यंतच्या माझ्या पात्रावर प्रेक्षकांनी जेवढं प्रेम केलेय तेवढचं प्रेम त्यांनी वल्लरीवर देखील करावे आणि तिला आपलेसे करावे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT