Neelam Bhardwaj: शाब्बास पोरी! २७ चौकार, २ षटकार; १८ वर्षीय निलमने ठोकली रेकॉर्डब्रेकिंग डबल सेंच्युरी

Neelam Bhardwaj Double Century: भारताची १८ वर्षीय स्टार फलंदाज निलम भारद्वाजने लिस्ट ए क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना द्विशतकी खेळी केली आहे.
Neelam Bhardwaj: शाब्बास पोरी! २७ चौकार, २ षटकार; १८ वर्षीय निलमने ठोकली रेकॉर्डब्रेकिंग डबल सेंच्युरी
neelam bhardwajtwitter
Published On

भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलियन महिला संघ या दोन्ही संघांमध्ये वनडे मालिकेचा थरार सुरु आहे. तर दुसरीकडे देशांतर्गत क्रिकेटमध्ये महिलांची सिनियर वुमेन्स वनडे ट्रॉफी स्पर्धा सुरु आहे.

या स्पर्धेत खेळत असताना, १८ वर्षांची युवा फलंदाज निलम भारद्वाजने इतिहासाला गवसणी घातली आहे. निलम भारद्वाज ही पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे, जिने सर्वात कमी वयात द्विशतकी खेळी करण्याचा कारनामा केला आहे. १८ वर्षीय निलम देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तराखंड संघाकडून खेळते. याच संघाकडून खेळताना तिने हा ऐतिहासिक कारनामा केला आहे.

Neelam Bhardwaj: शाब्बास पोरी! २७ चौकार, २ षटकार; १८ वर्षीय निलमने ठोकली रेकॉर्डब्रेकिंग डबल सेंच्युरी
IND vs AUS: एकमेकांवर डोळे वटारणं पडलं महागात! सिराज-हेडवर ICCची कठोर कारवाई

निलमची रेकॉर्डब्रेकिंग द्विशतकी खेळी

निलमने आपल्या द्विशतकी खेळीदरम्यान २७ चौकार आणि २ षटकार मारले. तिने या खेळीदरम्यान १०० धावा चौकार आणि षटकारांच्या साहाय्याने पूर्ण केल्या. तिच्या या रेकॉर्डब्रेकिंग खेळीच्या बळावर उत्तराखंडने पहिल्या डावात फलंदाजी करताना, १ गडी बाद ३७१ धावांचा भलामोठा डोंगर उभारला.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या नागालँड संघाला अवघ्या ११२ धावा करता आल्या. यासह उत्तराखंड संघाने हा सामना रेकॉर्डब्रेकिंग २५९ धावांनी आपल्या नावावर केला. द्विशतकी खेळी करणारी निलम भारद्वाज या विजयाची हिरो ठरली.

Neelam Bhardwaj: शाब्बास पोरी! २७ चौकार, २ षटकार; १८ वर्षीय निलमने ठोकली रेकॉर्डब्रेकिंग डबल सेंच्युरी
IND vs AUS: हेड - सिराज प्रकरण पेटलं! ICC कारवाई करणार; पण नेमकी कुणावर?

दिग्गज खेळाडूंच्या यादीत प्रवेश

महिलांच्या वनडे क्रिकेटमध्ये द्विशतकी खेळी करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. या शानदार द्विशतकी खेळीसह तिने दिग्गज खेळाडूंच्या यादीत प्रवेश केला आहे. निलम भारद्वाजचं हे द्विशतक खास ठरलं आहे.

यापूर्वी वर्षाच्या सुरुवातीलाच दिल्लीची फलंदाज श्वेता सेहरावतने लिस्ट ए क्रिकेटमध्ये द्विशतकी खेळी करण्याचा कारनामा केला होता. असा कारनामा करणारी ती पहिलीच भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली होती. तिने दिल्लीकडून खेळताना १५० चेंडूंचा सामना करत २४२ धावांची खेळी केली होती.

लिस्ट ए क्रिकेटमध्ये बरेच असे खेळाडू आहेत, ज्यांनी द्विशतकी खेळी करण्याचा कारनामा केला आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कुठल्याही महिला क्रिकेटपटूला द्विशतकी खेळी करता आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com