
वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला ६ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. वर्ल्डकपच्या अंतिम सामन्याचे आयोजन अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर करण्यात आले होते.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर या सामन्याचे आयोजन करण्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
आज मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, 'क्रिकेटमध्ये एका राज्याची लॉबी घुसलेली आहे. त्यांनी आधी सरदारभाई पटेल स्डेडियमचं नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम केलं. मग नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा अंतिम सामना घेऊन त्याचं सर्व श्रेय भाजप स्वत:कडे घेण्याच्या विचारात होते. पण असं होत नाही शक्यतो. म्हणजे जगाला असं दाखवण्याचा प्रयत्न झाला की, हा सामना भारतीय संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया नसून भारतीय जनता पक्ष विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा होता.', असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे. (Latest news in marathi)
या सामन्याचं आयोजन अहमदाबादमध्ये करण्यात आलं होतं याबाबत बोलताना ते म्हणाले की, 'दिल्लीला क्रिकेटचा माहौल असतो. क्रिकेटचे अनेक सामने दिल्लीच्या फिरोजशाह मैदानावर होत असतात. विशेषत:आतापर्यंतची पंरपरा आहे की, अशा प्रकारचे अंतिम सामने हे मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर होतात. क्रिकेटची पंढरी मुंबईतून सर्वच उद्योग घेऊन जायचं पैसा घेऊन जायचं कॉर्पोरेट कंपन्या घेऊन जायचे आणि क्रिकेट देखील घेऊन जायचं आहे.'
या सामन्यासाठी कपिल देव यांना आमंत्रण देण्यात आलं नव्हतं, या मुद्द्यावरून देखील त्यांनी भाजपवर टीका केली. त्यांनी सांगितले की, 'ज्याने देशाला सर्वप्रथम वर्ल्डकप जिंकून दिला. भारत जगज्जेता आहे आणि होऊ शकतो ही भावना निर्माण केली, त्या विश्वविजेत्या संघाचा कर्णधार कपिल देव आणि भारतीय संघाला आमंत्रित केलं नाही. कारण कपिल देवचं आगमन झालं असतं तर इतर राजकीय नेत्यांच्या प्रसिद्धीला थोडसं ग्रहण लागलं असतं.', अशी टीका संजय राऊत यांनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.