Pathaan Trailer: शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत असलेल्या 'पठान' चित्रपटाचा ट्रेलर काल सोशल मीडियावर प्रदर्शित झाला. अवघ्या काही वेळातच चित्रपटाचा ट्रेलर जबरदस्त व्हायरल झाला असून लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. दरम्यान, आपल्या बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत असलेला अभिनेता कमाल आर खानने दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्यावर चित्रपटाविषयी काही टीका केली आहे. केआरकेचे एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
ट्रेलरमधील शाहरुख खानचा लूक सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम असून त्यांच्या अभिनयाचीही जोरदार चर्चा होत आहे. आपल्या बेधडक वक्तव्याने चर्चेत असलेला अभिनेता केआरकेने पठान चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्यावर काही टीका केली आहे. या ट्विटमध्ये केआरकेने दिग्दर्शकांवर चित्रपटातील अॅक्शन सीन्स कॉपी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आपल्या विचित्र चित्रपट समीक्षांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या केआरकेने ‘पठान’चा ट्रेलर प्रदर्शित होण्याआधीच चित्रपटावर टीका करण्यास सुरुवात झाली होती. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्याने एक ट्वीट केलं आहे.
या ट्वीटमध्ये त्याने लिहिलं, “पठान चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर मला धक्काच बसला. मी फक्त एवढंच बोलू शकतो की हा काय फालतू चित्रपट आहे. शाहरुख खान एवढा फालतू चित्रपट कसा काय करू शकतो. जॉन अब्राहमच्या ‘अॅटॅक’ चित्रपटाची कथाही अशीच होती. जो पूर्णतः फ्लॉप ठरला होता.”
KRK ने काल आणखी एक ट्वीट केले होते, '#War पुन्हा पाहिल्यानंतर, मी 100% खात्रीने सांगू शकतो की दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद चांगला चित्रपट बनवू शकत नाही. त्याला स्क्रिप्टची अजिबात कल्पना नाही. परदेशी चित्रपटांतील मोठमोठे दृश्य कसे कॉपी करायचे हे त्याला चांगले माहित आहे. दुसऱ्यांदा कोणीही War सहन करू शकत नाही.'
दरम्यान, बॉलिवूड चाहत्यांचे बोलायचे झाले तर, पठानच्या ट्रेलरला आतापर्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील शाहरुख खानचा हा अॅक्शन अवतार चाहत्यांना पसंदीस पडत आहे. पठान हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र, रिलीजपूर्वीच या चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यावरून वाद सुरू झाला असून तो वाद संपण्याचे नाव घेत नाहीये.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.