Chitra Navathe: प्रेमळ आजीची एक्झिट; ज्येष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे निधन

मराठी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे आज बुधवारी निधन झाले.
Chitra Navathe
Chitra Navatheश्रेयस सावंत
Published On

Chitra Navathe: मराठी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री चित्रा नवाथे यांचे आज बुधवारी निधन झाले. गेल्या दीड वर्षांपासून त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने मुलुंडच्या सरला नर्सिंग होममध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. काल रात्रीपासून त्यांची प्रकृती आणखीन खालावली होती. अशात वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. (Latest Chitra Navathe News)

चित्रा नवाथे यांनी अनेक चित्रपटांमध्ये आजीची भूमिका साकारली आहे. प्रत्येक लहान मुलाच्या त्या फेवरेट आजी झाल्या होत्या. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी टींग्या, पोरबाजार, बोक्या सातबंडे अशा चित्रपटांमध्ये काम केले होते. अगडबंम आणि अगं बाई अरेच्चा या चित्रपटातील त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या. अगं बाई अरेच्चा या चित्रपटात त्यांनी मुक अभिनय केला होता. या चित्रपटाने त्यांना मोठ्या प्रसिद्धी झोतात आणले.

Chitra Navathe
Man Kasturi Re: यंदाच्या नवरात्रीत अभिनय आणि तेजस्वीच्या 'मन कस्तुरी रे'चा सुगंध दरवळणार

लाखाची गोष्ट, वहिनीच्या बांगड्या या चित्रपटांच्या यशामध्ये देखील त्यांचा खारीचा वाटा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक चित्रपटांमध्ये सर्वांची प्रमेळ आजी साकरणाऱ्या चित्रा त्यांच्या शेवटच्या काळात वृद्धाश्रमात होत्या. त्यांची सेवा करण्यासाठी कुटुंबीय आणि इतर नातेवाईक पुढे येत नव्हते. शेवटी त्यांनी स्वत: वृद्धाश्रमाचा पर्याय निवडला होता.

Chitra Navathe
Abhinay Berde Exclusive | मन कस्तुरी रे निमित्ताने अभिनय बेर्डेशी खास बातचीत

चित्रा यांचे नाव कुसुम असे होते. चित्रपटाच्या कारकिर्दीत आल्यावर त्यांनी आपले नाव चित्रा केले. चित्रा यांनी आपल्या बहिणीबरोबरच अभिनय क्षेत्रात पहिले पाऊल ठेवले. कुसूम आणि कुमूद या दोन बहिणींनी १९५२ साली प्रदर्शित झालेल्या लाखाची गोष्ट या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र अभिनय केला होता. सांताक्रुझ येथील स्मशानभूमीत चित्रा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com