Bigg Boss 16: ‘बिग बॉस १६’च्या ग्रँड फिनाले आधीच एका स्पर्धकाची होणार एक्झिट, आले 'हे' कारण समोर...

‘बिग बॉस १६’च्या महाअंतिम सोहळ्यापूर्वी एका सदस्याला या घराचा निरोप घ्यावा लागणार आहे.
Bigg Boss Nomination Contestant
Bigg Boss Nomination ContestantInstagram/ @colorstv
Published On

Bigg Boss 16: टेलिव्हिजन वरील सर्वाधिक चर्चेत असलेला शो म्हणजे बिग बॉस. बिग बॉसच्या शोला प्रेक्षकांचाही चांगलाच प्रतिसाद मिळतो. सध्या हिंदी टेलिव्हिजनवर बिग बॉसचा सोळावा सीजन सुरु आहे. याचा ग्रँड फिनाले सोहळा फेब्रुवारी महिन्यात पार पडणार आहे. ‘बिग बॉस १६’च्या महाअंतिम सोहळ्यापूर्वी एका सदस्याला या घराचा निरोप घ्यावा लागणार आहे.

Bigg Boss Nomination Contestant
Golden Globe Awards: आंतरराष्ट्रीय स्तरावर दाक्षिणात्य चित्रपटांचा डंका, 'नाटू नाटू'ने गोल्डन ग्लोबमध्ये पटकवला पुरस्कार...

फेब्रुवारी महिन्यात हा ग्रँड फिनाले पार पडणार असून या पूर्वी घरातील स्पर्धकांमध्ये आपापसात चढा- ओढ होताना दिसणार आहे. सध्या घरात शिव ठाकरे, एमसी स्टॅन, साजिद खान, टीना दत्ता, सुम्बुल तौकीर यांसारख्या सदस्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. तर अब्दू रोजिकने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

Bigg Boss Nomination Contestant
Abhijit Bichukale Accident News: मोठी बातमी! अभिजीत बिचुकलेचा पुण्यात अपघात

सध्या एक नुकतीच बिग बॉस १६ संबंधित एक माहिती समोर आली आहे. ग्रँड फिनालेपूर्वी एक स्पर्धक घराच्या बाहेर जाणार आहे. बिग बॉस १६’ मधील खेळ कोणता स्पर्धक अर्धवट सोडून जाणार हे ऐकून कदाचित तुम्हालाही धक्का बसेल. पण काही कारणास्तव या सदस्याला हा कठीण निर्णय घ्यावा लागणार आहे.

एका हिंदी संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, अब्दू रोजिक खेळाबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्याचे काही महत्वाचे प्रोजेक्ट्स असल्याने तो घराबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्याला दिलेल्या वेळेत तो प्रोजेक्ट पुर्ण करायचा असल्याने हा खेळ अर्धवट सोडण्याचा विचार आहे. पण त्याचा या घराला हा अखेरचा निरोप असणार आहे.

Bigg Boss Nomination Contestant
Hrithik Roshan: हृतिक रोशनला गर्लफ्रेंडकडून अनोख्या शुभेच्छा, म्हणाली 'तू माझ्यासाठी जन्म घेतला...'

‘बिग बॉस १६’च्या घरातून काही दिवसांपूर्वी अब्दूने अचानक एक्झिट घेतली होती. पण प्रेक्षकांचे प्रेम आणि प्रतिसाद पाहता त्याने पुन्हा एकदा घरात एन्ट्री घेतली. वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी त्याने सर्वाधिक मेहनत करत सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेतलं आहे. तसेच अब्दू सोशल मीडियावर बराच सक्रिय असून त्याच्या चाहत्यांची संख्या ही बरीच मोठी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com