Park Bo-ram Dies Saam tv
मनोरंजन बातम्या

Park Bo-ram Dies : ३० वर्षीय गायिकेचं निधन; मित्रांसोबत मद्य पार्टी करताना अचानक कोसळल्यानंतर उठलीच नाही

Park Bo-ram Death : कोरियन मनोरंजनसृष्टीतून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. प्रसिद्ध के-पॉप गायिका पार्क बो राम या ३० वर्षीय गायिकेचं निधन झालं आहे. xanadu एंटरटेनमेंटने बो रामच्या निधनाबाबत वृत्त दिलं आहे.

Vishal Gangurde

Korean Singer Park Bo Ram Passes Away:

कोरियन मनोरंजनसृष्टीतून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. प्रसिद्ध के-पॉप गायिका पार्क बो राम या ३० वर्षीय गायिकेचं निधन झालं आहे. xanadu एंटरटेनमेंटने बो रामच्या निधनाबाबत वृत्त दिलं आहे. बो रामचं ११ एप्रिल रोजी सायंकाळी अचानक निधन झालं. बो रामच्या मृत्यूने कोरियातील मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे.

गायिका पार्क बो रामचं निधन नेमकं कसं झालं, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पार्क बो रामच्या निधनाबाबत नामयांगजू पोलीस स्टेशनने रिपोर्ट जारी केला आहे. 'बो राम मित्रांसोबत मद्य पार्टी करत होती. त्यानंतर तिचं निधन झालं. पोलिसांकडून तिच्या निधनामागील कारणाचा तपास सुरु केला आहे, अशी माहिती रिपोर्टमध्ये आहे.

एजेन्सीने दिला निधनाच्या वृत्ताला दुजोरा

XANADU एंटरटेनमेंटने याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी १२ एप्रिलला सकाळी गायिका बो रामच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. निवेदनात म्हटलं की, 'पार्क बो राम ११ एप्रिलला सायंकाळी उशिरा अचानक आम्हाला सोडून गेली आहे. या माहितीनंतर आम्हीही व्यथित झालो आहोत. तिच्या निधनाची माहिती चाहत्यांना सांगत आहोत. गायिकेच्या पालकांशी चर्चा केल्यानंतर तिच्या अंत्यविधीची माहिती देण्यात येईल'.

मीडिया रिपोर्टनुसार, के-पॉप गायिका पार्क बो रामने मागील वर्षात नवीन गाणे प्रदर्शित झाले होते. तिने अवघ्या १७ वर्षांच्या वयात मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. तिने २०१० मध्ये 'सुपर स्टार' २ या गाणे गाण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daycare Safety : पालकांसाठी अलर्ट! डे केअरमध्ये मुलांना ठेवण्यापूर्वी तपासा ‘या’ महत्वाच्या सुविधा

देवेंद्र फडणवीस चोरांचे सरदार, तुमच्यावर कुणाचा दबाव? उद्धव ठाकरेंची जळजळीत टीका

Shravan Somvar: परळी वैजनाथ मंदिरात श्रावण सोमवारी भाविकांची गर्दी; आकर्षक सजावट आणि विशेष पूजांनी परिसर भक्तिमय वातावरणात तल्लीन|VIDEO

Maharashtra Live News Update: जेजुरीत पाच मजली इमारत झुकली

प्रतिकात्मक बार तयार करून पैसे उधळत ठाकरे गटाचे महायुती सरकारच्या निषेधार्थ अनोखे आंदोलन|VIDEO

SCROLL FOR NEXT