Param Sundari Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Param Sundari Collection : सिद्धार्थ-जान्हवीच्या केमिस्ट्रीची चाहत्यांना भुरळ, 'परम सुंदरी'ची २ दिवसांत छप्परफाड कमाई

Param Sundari Box Office Collection Day 2 : सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूरचा 'परम सुंदरी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने दोन दिवसांत किती कोटींचा व्यवसाय केला, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर 'परम सुंदरी' मध्ये मुख्य भूमिकेत आहेत.

'परम सुंदरी' ही एक प्रेमकथा आहे.

सिद्धार्थ-जान्हवीच्या चित्रपटातील केमिस्ट्रीने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा ( Sidharth Malhotra ) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) चा 'परम सुंदरी' (Param Sundari) चित्रपट 29 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'परम सुंदरी' रोमँटिक - कॉमेडी ड्रामा आहे. चित्रपटाची कथा दिल्लीतील मुलगा आणि केरळच्या मुलीभोवती फिरते. चित्रपटात दोन संस्कृतींचे सुंदर दर्शन पाहायला मिळते. चित्रपटातील सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहेत.

'परम सुंदरी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 2

मीडिया रिपोर्टनुसार, 'परम सुंदरी' चित्रपटाने पहिल्या दिवशी 7.25 कोटींची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी 9 कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे दोन दिवसांत सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूरच्या 'परम सुंदरी' चित्रपटाने 16.25 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. आता रविवारी चित्रपट किती कोटी कमावते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'परम सुंदरी' चित्रपटाचे बजेट 40-50 कोटी रुपये आहे.

'परम सुंदरी' ओटीटी रिलीज अपडेट

मीडिया रिपोर्टनुसार, 'परम सुंदरी' चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्म पाहायला मिळणार असून चित्रपट ऑक्टोबर 2025 मध्ये शेवटी ओटीटी पाहायला मिळू शकतो. 'परम सुंदरी' चित्रपटाचे दिग्दर्शक तुषार जलोटा आहे.'परम सुंदरी' चित्रपटातील सिद्धार्थ आणि जान्हवीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली आहे.

'परम सुंदरी' स्टारकास्ट मानधन

'परम सुंदरी' चित्रपटासाठी सिद्धार्थ मल्होत्राने 10-20 कोटी मानधन आणि जान्हवी कपूरने 4-5 कोटी फी घेतली आहे. अभिनेता संजय कपूरने 'परम सुंदरी' चित्रपटासाठी 50 लाख रुपये मानधन घेतले. मनजोत सिंहने 'परम सुंदरी' चित्रपटातून 25 लाख रुपये कमावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup: नेदरलँड्सने वाढवली होती धडधड; टीम इंडियाचं गचाळ क्षेत्ररक्षण तरीही भारताचा रोमांचक विजय

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT