Pankaj Tripathi: पंकज त्रिपाठी पुन्हा एकदा त्यांच्या वेब सिरीज क्रिमिनल जस्टिस सीझन ४ मधून चाहत्यांना भूरळ पाडत आहेत. चाहते त्यांना माधव मिश्राच्या भूमिकेत पाहून आनंदी आहेत. गेल्या काही दिवसांत या सीझनला प्रचंड यश मिळाले आहे. आता या चौथ्या सीझनमध्ये एका हाय प्रोफाइल मर्डर कोडी सोडवली जात आहे. पंकज त्रिपाठी या कोर्टरूम ड्रामामध्ये वकील माधव मिश्राच्या भूमिकेत पुन्हा झळकत आहेत. पण या सीझनच्या आठ भागांसाठी अभिनेत्याने किती मानधन घेतले हे तुम्हाला माहिती आहे का?
पंकज त्रिपाठीचे मानधन
वनइंडियाच्या वृत्तानुसार, पंकज त्रिपाठीने क्रिमिनल जस्टिस सीझन ३ साठी ४ कोटी रुपये आकारले. आता अभिनेत्याने त्याचे मानधन दुप्पट केले आहे आणि चौथ्या सीझनसाठी १० कोटी रुपये आकारले आहेत. म्हणजेच, अभिनेत्याने प्रत्येक भागासाठी १.२५ कोटी रुपये आकारले आहेत.
लेखकाने अभिनेत्याचे कौतुक केले आहे
या वेब सिरीजची कथा संदीप जैन यांनी लिहिली आहे. माधव मिश्राच्या भूमिकेत पंकजला कास्ट करण्याबद्दल ते म्हणाले, "मी कल्पनाही करू शकत नाही की कोणीही इतक्या सुंदर आणि इतक्या निरागसतेने हे काम करु शकतो. जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुम्हाला माहिती असते की ही साधी ओळ त्याच्या व्यक्तिमत्त्वामुळे इतक्या सुंदरपणे साकारेल.
कलाकार
यावेळी क्रिमिनल जस्टिसमध्ये, रोशनी सलुजाच्या हत्येचे गूढ उलगडत आहे. रोशनीची भूमिका आशा नेगी साकारत आहे. मोहम्मद झीशान अय्युब, सुरवीन चावला, मीता वशिष्ठ, श्वेता बसू प्रसाद, खुशबू अत्रे आणि बरखान सिंग हे या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसत आहेत. दर गुरुवारी एक नवीन भाग स्ट्रीम करून निर्माते प्रेक्षकांमध्ये आपली पकड कायम ठेवत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.