Bigg Boss Marathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : पॅडीदादाची घरातून Exit; 'ती' पोस्ट चर्चेत, 'देवमाणूस' म्हणत नेटकऱ्यांनी केलं कौतुक

Pandharinath Kamble Elimination : बिग बॉसच्या घरातून या आठवड्यात पॅडी दादा बाहेर पडला आहे. त्याच्या एलिमिनेशनमुळे चाहते खूप दुखावले आहेत.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) आता शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपले आहे. या आठवड्यात घरातील सर्व सदस्य एलिमिनेट (Elimination) झाले होते. काल बिग बॉस घरात धनंजय दादा, जान्हवी, अंकिता आणि पॅडी दादा डेंजर झोनमध्ये होते. त्यातून काल सर्वांचा लाडका पॅडी दादा 'बिग बॉस मराठी' च्या घरातून बाहेर गेला. त्याचा घरातील प्रवास संपला.

पॅडी दादाने (Pandharinath Kamble ) घरातून बाहेर पडताच एक भावुक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी रसिक मायबाप प्रेक्षकांचे दिलेल्या प्रेमासाठी आभार मानले आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर ग्राफिक्समध्ये आपला एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्य पॅडी दादा एका वॉरियरप्रमाणे लढताना दिसत आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एका यूजरने लिहिलं की, "दादा Unfair…" आणि दुसऱ्या एका यूजरने लिहिलं की, "देवमाणूस!" तर अनेकांच्या या कमेंट्स आहेत की, "आमच्यासाठी तूच विजेता आहेस पॅडी दादा" तसेच अनेक कलाकारांनी देखील त्याच्या या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.

पॅडी दादा (Paddy Dada) तब्बल ६२ दिवसांनंतर बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले आहेत. घराबाहेर जाताना पॅडी दादाने आपला पाठिंबा सूरज दिला. अनेक चाहत्यांनी पॅडी दादा घराबाहेर गेल्यामुळे आपली नाराजी व्यक्त केली आहे. आता बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर जाणार आणि कोण बिग बॉसची ट्रॉफी उचलणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील ड्रग्स तस्करने घरातच उभी केली प्रयोगशाळा, तयार करत होता लाखो रुपयांचा गांजा

चिनी लोकांचे डोळे लहान का असतात? कारण एकालाही माहित नाही

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे हॉस्पिटलमध्ये; सरेंडरसाठी ४ दिवसांचा वेळ मागितला, पण...

'ED ने राहुल गांधींची बदनामी केली', मुंबईत काँग्रेस आक्रमक, थेट कार्यालयावर मोर्चा

Kitchen Hacks : घरात पंख्यावर खूपच धुळ बसली? मग 'या' सिंपल ट्रिक्सने करा स्वच्छ

SCROLL FOR NEXT