बहुचर्चित ‘पंचायत ३’ वेब सीरिज २८ मे रोजी 'ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर वेबसीरीजप्रमाणेच त्यातील कलाकारही चर्चेत आहेत. ‘पंचायत ३’सीरीजमध्ये अनेक नवीन कलाकार पाहायला मिळत आहेत. त्यातीलच एक पात्र म्हणजे अम्माजी. हे पात्र अभिनेत्री आभा शर्मा यांनी साकारले आहे. सरकारी योजनेतून घर मिळावं यासाठी ज्याप्रकारे अम्माजींनी अभिनय केला, ते पाहून अनेकांनी टाळ्या वाजवल्या आहेत. नेमक्या आभा शर्मा कोण आहेत ? जाणून घेऊया...
७५ वर्षीय आभा शर्मा यांनी आपल्या सिने करियरबद्दल इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी फिल्मी करियर आणि पर्सनल आयुष्यावर भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या, "मी आमच्या कुटुंबातील सर्वात लहान होती. माझी बहिण दिल्लीत, मोठा भाऊ हैदराबाद मध्ये राहायला होते. पण गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांचंही निधन झालेलं आहे. मी वडिलांच्या निधनानंतर एका टेलिकॉम कंपनीत नौकरी करत होते. नोकरीसोबतच आईकडेही लक्ष द्यायला लागायचं. त्यामुळे मी लग्नही केलं नाही."
"बालपणापासून अभिनेत्री बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आभाने जे.जे. स्कुल ऑफ आर्ट्समध्ये डिप्लोमा केला आहे. १९७९ पासून तिने टीचर म्हणून नोकरी करायला सुरूवात केली. मी बालपणापासूनच अभिनेत्री बनण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पण माझ्या आईने अभिनयात करियर करण्यासाठी मला नकार दिला होता. तिला मी अभिनय केलेला आवडत नव्हतं. पण तरीही मला अभिनयामध्ये खूप आवड होती. मी आईच्या विरोधातही जाण्याचा विचार केला होता. आईच्या निधनानंतर मी पुन्हा अभिनय करायला सुरुवात केली. यासाठी मला माझ्या बहिण आणि भावांनी खूप मदत केली होती. "
आभाने पुढे मुलाखतीमध्ये सांगितलं की, "मला हिरड्यांमध्ये इन्फेक्शन झालं होतं. त्यामुळे माझे सर्व दात पडले. वयाच्या ४५ वर्षी मला हा रेअर आजार झाला होता ज्यामुळे माझे हातपाय सतत थरथर कापायचे. पण तरीही मी नोकरी करत होते. १९९१ मध्ये मी जॉब सोडून २००८ मध्ये लखनऊमध्ये थिएटरमध्ये काम करण्यास सुरूवात केली. पण मी नाटकांमध्ये जास्त भाग घेऊ शकत नव्हते." असं त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.