नवी दिल्ली : प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खानला पोलिसांनी दुबई विमानतळावरून ताब्यात घेत अटक केली आहे. दुबई पोलिसांनी राहतला विमानात प्रवेश करण्यापूर्वी अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला सोबत घेऊन गेले.
पोलिसांनी राहत फतेह अली खानला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. राहतला ताब्यात घेतानाचाही व्हिडिओ समोर आला आहे. या अटकेच्या वृत्तादरम्यान, राहत फतेह अली खानने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत अटक केल्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे. माझ्या अटकेचं वृत्त अफवा असल्याचं त्याने सांगितलं आहे.
राहत फतेह अली खानने म्हटलं की, मी दुबईमध्ये गाण्याच्या व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी आलो आहे. मी ठिक आहे. मी सर्वांना विनंती करतो की, या अफवांवर विश्वास ठेवू नका. मी लवकरच मायदेशात परतेल. तसेच तुम्हाला नवीन गाण्याने आश्चर्यचकीत करेल'.
गायक राहतच्या या व्हिडिओवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या व्हिडिओमध्ये अटकेविषयी पार बोलला नाही. त्याने या व्हिडिओमध्ये वृत्ताचं खंडन देखील केलं नाही. दुबईमध्ये ताब्यात घेतलं की नाही? यावरही राहतने भाष्य केलं नाही. ताब्यात घेतलं नाही तर त्याचा उल्लेख का केला नाही? असा सवाल चाहते करू लागले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, राहत फतेह अली खानची माजी मॅनेजर आणि प्रसिद्ध शोबिज प्रमोटर सलमान अहमदमने त्याच्याविरुद्ध दुबईमध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, गायक राहत फतेह अली खानला अधिकृतरित्या अटक करण्यात आलेली नाही. राहत एका कार्यक्रमासाठी दुबईला पोहोचला होता. या वर्षीच्या जानेवारी महिन्यात राहतच्या विरोधात मनी लॉड्रिंग आणि कर चोरी प्रकरणाचीही चौकशी करण्यात आली होती.
या चौकशीत त्याने देशात आणि परदेशात केलेल्या कार्यक्रमातून १२ वर्षांत ८ अब्ज रुपये कमावले होते. राहतवर नेमके काय आरोप आहेत, याची माहिती समोर आलेली नाही. पोलीस या प्रकरणी अधिक माहिती गोळा करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.