Rahat Fateh Ali khan : गायक राहत फतेह अली खानची 'बाटली'साठी नोकराला बेदम मारहाण, VIDEO व्हायरल

Rahat Fateh Ali khan Video Viral : राहत फतेह अली खान या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला चप्पलने मारहाण करताना दिसत आहे. पाठीवर देखील बुक्क्याने मारहाण करताना दिसत आहे.
Rahat Fateh Ali khan
Rahat Fateh Ali khanSaam TV
Published On

Viral Video :

पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खानचा आपल्या नोकराला चप्पलने मारहाण करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राहत फतेह अली खानवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात होती.

राहत फतेह अली खानने या कृतीबद्दल खेद व्यक्त करत माफी मागितली आणि आपली बाजू मांडली आहे. ज्या बाटलीवरुन ही मारहाण झाली त्यामध्ये दारू नसून पवित्र पाणी आहे, असं देखील राहत फतेह अली खान सांगताना दिसत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rahat Fateh Ali khan
Fighter Movie: ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'ॲनिमल'च्या चर्चा, तर थिएटरमध्ये अनिल कपूरच्या 'फायटर'चा गाजावाजा

राहत फतेह अली खान या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला चप्पलने मारहाण करताना दिसत आहे. पाठीवर देखील बुक्क्याने मारहाण करताना दिसत आहे. माझी बाटली कुठे आहे, अशी विचारणा करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर राहत फतेह अली खानने दारूच्या बाटलीसाठी आपल्या नोकराला अशाप्रकारे मारहाण केल्याचा दावा करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

माफी मागताना राहत फतेह अली खानने म्हटलं की, हा आमच्या आपापसातील विषय आहे. मी त्याला चुकीची शिक्षा दिली. त्याने चांगलं काम केलं तर त्याची प्रशंसा देखील मी करतो. व्हिडिओमध्ये ज्या बाटलीबद्दल बोलले जात आहे ती दारूची बाटली नसून पवित्र पाण्याची बाटली होती, जी त्याने हरवली.

Rahat Fateh Ali khan
Odisha Accident Video: एक चूक अन् ७ जणांनी गमावला जीव! भरधाव स्कॉर्पिओच्या अपघाताची भयंकर दृष्य; VIDEO

राहत फतल अली खान हे आपल्या वडिलांसारखे आणि शिक्षक असल्याचे नोकर नावीद हसनैन यांनी सांगितले. ते आपल्यावर खूप प्रेम करतात. त्यांची बदनामी करण्यासाठी हा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com