Pakistan Bans Indian Songs 
मनोरंजन बातम्या

Pakistan Bans Indian Songs : पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला धास्ती, भारतीय गाण्यांवर घातली बंदी|VIDEO

Pahalgam attack India Pakistan tension : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान सरकारने भारतीय गाण्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. एफएम रेडिओवर लता मंगेशकर, रफी, किशोर कुमार यांची गाणी वाजणार नाहीत.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Lata Mangeshkar Kishore Kumar songs banned Pakistan : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहचलाय. भारताकडून पाकिस्तानची चारी बाजूने कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय. भारताच्या कडक इशाऱ्यानंतर पाकिस्तानमधूनही प्रत्युत्तर देण्यात येत आहे. पाकिस्तानमध्ये भारतीय गाण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पाकिस्तानी एफएमवर यापुढे भाराताची गाणी वाजणार नाहीत. पाकिस्तान ब्रॉडकास्ट असोशिएशनने हा आवाज घेतलाय. लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार यांच्या गाण्यावर पाकिस्तानवर बंदी घालण्यात आली आहे.

पहलगामध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला, त्यामध्ये २६ निष्पाप पर्यटकांचा जीव गेला होता. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील तणाव वाढलाय. दोन्ही देशांकडून कारवाईचा इशारा देण्यात येतोय. पाकिस्तानकडून भारतीय गाण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याबाबतचे अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेय.

भारतीय गाण्यांवर बंदी घातली

१ मे २०२५ रोजी पाकिस्तान सरकारने भारतीय गाण्यावर बंदी घालण्यासंदर्भात अधिसूचना जारी केली. या प्रसिद्धीपत्रकात म्हटलेय की, पाकिस्तानात आता बॉलिवूड गाण्यांवर बंदी घालण्यात आली आहे. यापुढे पाकिस्तानी एफएम रेडिओ स्टेशनवर भारतीय गाणी वाजवली जाणार नाहीत. हा निर्णय संपूर्ण देशाचा विचार करून घेण्यात आला आहे.

पाकिस्तानात कोणत्या गायकाची गाणी वाजायची?

पीबीएने तात्काळ प्रभावाने देशभरातील एफएम रेडिओ केंद्रांवर भारतीय गाण्यांचे प्रसारण बंद केले आहे. लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार आणि मुकेश यांसारख्या दिग्गज गायकांची गाणी पाकिस्तानात लोकप्रिय आहेत आणि ती दररोज एफएम रेडिओवर वाजवली जातात. यापुढे या गाण्यावर बंदी घालण्यात आली आहे, असे पाकिस्तान प्रसारण संघटनेचे (पीबीए) महासचिव शकील मसूद यांनी सांगितले. माहिती मंत्री अत्ता तरार यांनी पीबीएच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Ladki Bahin Yojana : महत्त्वाची बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारने पुन्हा घेतला मोठा निर्णय

Three Language Policy : मोठी बातमी! अखेर त्रिभाषा धोरणासाठी समिती स्थापन, ७ जणांचा समावेश

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

SCROLL FOR NEXT