Crime : अंघोळ करताना मुलीचा न्यूड व्हिडिओ कॉल, ६० वर्षाचा वृद्ध डिजिटल अरेस्ट, लाखोंचा गंडा

Digital Arrest in chhatrapati sambhaji nagar : छत्रपती संभाजीनगरमधील ६० वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाला अंघोळ करताना आलेल्या न्यूड व्हिडिओ कॉलमुळे १४ लाख रुपयांचा फटका बसला.
Digital Arrest in chhatrapati sambhaji nagar
Digital Arrest in chhatrapati sambhaji nagarAI Image
Published On

माधव सावरगावे, छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी

WhatsApp nude call scam : छत्रपती संभाजीनगरमध्ये डिजिटल अरेस्टद्वारे फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका ६० वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीला (Retired man blackmailed online) व्हॉट्सअॅपवरील काही सेकंदांच्या व्हिडिओ कॉलमुळे तब्बल १४ लाख रुपयांचा फटका बसला. अंघोळ करताना आलेला न्यूड व्हिडिओ कॉल आणि त्यानंतर तो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या तोतया पोलिसांनी (Cyber fraud in Maharashtra) या वृद्धाला लुटले. बनावट पोलिसांनी जेलची भीती दाखवत पैसे उकळले. या प्रकरणी मोनी पाटील, हेमंत मल्होत्रा, प्रमोद राठोड, अरविंदसिंगसह दोन अज्ञात व्यक्तींवर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. डिजिटल युगातीलया सायबर गुन्ह्याने (Maharashtra cyber crime news) सावधानतेचा इशारा दिला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये सेवानिवृत्त शिक्षकाला अंघोळ करताना व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल रिसिव्ह करणे तब्बल १४ लाख रुपयांत पडले आहे. व्हॉट्सअॅपवर आलेल्या काही सेकंदांच्या व्हिडिओ कॉलने ६० वर्षीय सेवानिवृत्त खासगी नोकरदाराला १४ लाखांचा गंडा बसला. न्यूड व्हिडिओ कॉल (WhatsApp video call blackmail) करत तो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर तोतया पोलिसांनी फोन करून जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या शिक्षकाने आरोपीने सांगितल्याप्रमाणे विविध बँक खात्यांवर ही रक्कम टाकली. या प्रकरणी मोनी पाटील, हेमंत मल्होत्रा, प्रमोद राठोड, अरविंदसिंग व दोन अज्ञात व्यक्तींवर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Digital Arrest in chhatrapati sambhaji nagar
ISI Spy Arrested : पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवली, गुप्तचर एजन्सीने पठाण खानला ठोकल्या बेड्या

६० वर्षीय वृद्धाला अंघोळ करताना व्हिडिओ कॉल आला. त्यांनी तो उचलला असता समोरून नग्न अवस्थेत एक तरुणी बोलत होती. काही कळण्याच्या आतच हा कॉल कट झाला. अंघोळ करत असल्याने फिर्यादीदेखील अर्धनग्न अवस्थेत होते. तो व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला. काही वेळाने हेमंत मल्होत्राने फोनवरून तुमचा न्यूड व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तुम्हाला पोलिस कॉल करतील असे सांगितले. त्यानंतर काही वेळातच प्रमोद राठोड नाव सांगून पोलिसांचा फोन आला. त्याने तुम्हाला जेलमध्ये टाकतो. जेलमध्ये जायचे नसेल तर सेटलमेंटसाठी हेमंतला बोलून घ्या अशी धमकी दिली. त्यानंतर सेवानिवृत्त व्यक्तीने १४ लाख रूपये वेगवेगळ्या बँक खात्यात पाठवले.

Digital Arrest in chhatrapati sambhaji nagar
Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, नवी मुंबईत ५५ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com