ISI Spy Arrested : पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवली, गुप्तचर एजन्सीने पठाण खानला ठोकल्या बेड्या

Pakistan ISI Indian agent : जैसलमेरमधील पठाण खानला पाकिस्तानच्या ISI साठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. भारत-पाक सीमेवर वाढलेली हालचाल आणि पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात तणाव निर्माण झाला आहे.
Pakistan ISI Indian agent
Pakistan ISI Indian agentSaam TV News
Published On

Rajasthan Jaisalmer man arrested for spying : पाकिस्तानच्या ISI साठी हेरगिरी करणार्‍याला राजस्थानमध्ये गुप्तचर यंत्रणेकडून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्याच्यावर ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्ट, 1923 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. जैसलमेरमधील पठाण खान याला पाकिस्तानच्या ISI साठी हेरगिरी केल्याप्रकरणी राजस्थान गुप्तचर यंत्रणेने गुरूवारी रात्री बेड्या ठोकल्या. मिळालेल्या माहितीनुसार, महिनाभरापूर्वी पठाण खानला ताब्यात घेण्यात आले होते. चौशीनंतर एक मे रोजी त्याला औपचारिकरित्या अटक करण्यात आली.

राजस्थान पोलिसांनी जैसलमेर येथील रहिवासी पठाण खान याला पाकिस्तानच्या ISI साठी ( इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स ) हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. पठाण खान याने २०१३ मध्ये पाकिस्तानला भेट दिली होती. तेव्हा तो पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आला. पठाण खान याला पैशांचे आमिष दाखवून हेरगिरीचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर २०१३ पासून ते पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांशी संपर्कात आहे. जैसलमेर आंतरराष्ट्रीय सीमेशी संबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तानी हँडलर्सना पुरवल्याचे तपासात उघड झालेय. त्यामुळे त्याच्याविरुद्ध ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्ट, 1923 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pakistan ISI Indian agent
Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, नवी मुंबईत ५५ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

२२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलागमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. त्यामध्ये २२ निष्पाप पर्यटकांचा जीव गेला. दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील तणाव अधिकच वाढला. भारताकडून पाकड्यांची कोंडी करण्यात येत आहे. त्यातच राजस्थानातील आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या गावांमध्ये स्थानिक लोक सर्व शक्यतांसाठी तयार आहेत. या गावांमध्ये नागरिक आणि सुरक्षा दलांसाठी बंकर्स बांधण्यात आले आहेत. येथील स्थानिकांनी २२ एप्रिलच्या पहलगाम हल्ल्याचा निषेध केला असून भारत सरकारने योग्य प्रत्युत्तर द्यावे, अशी मागणी केली आहे.

Pakistan ISI Indian agent
Bhendwal Ghatmandni : पंतप्रधान तणावात, देशावर मोठे संकट, युद्धाचे सावट, 'भेंडवळ'ची भविष्यवाणी!

पाकिस्तानकडून सैन्य तैनाती, भारताची चोख तयारी

भारताच्या कडक इशाऱ्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानकडूनही तयारी करण्यात येत असल्याचे समोर आलेय. पाकिस्तान सध्या भारताच्या सीमेवर सैन्य वाढवत आहे. त्यांनी हवाई संरक्षण आणि तोफखाना युनिट्स पुढील स्थानांवर तैनात केली आहेत. पाकिस्तानी हवाई दल फिझा-ए-बदर, ललकार-ए-मोमिन आणि झर्ब-ए-हैदरी असे तीन सैन्य सराव एकाच वेळी करत आहे. F-16, J-10 आणि JF-17 यासारखी प्रमुख लढाऊ विमानांचा सराव सुरू आहे. पाकिस्तानच्या हालचाली वाढल्यानंतर भारताने आपली ताकद दाखवली आहे. समुद्रात, आकाशात आणि सीमेवर भारताच्या सैन्यांनी सराव सुरू केला.

Pakistan ISI Indian agent
Pune : पुण्यातून धावणार वंदे भारत स्लीपर, तिकीट किती, थांबा कुठे? जाणून घ्या डिटेल्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com