Buldhana Bhendwal Ghatmandni : बुलढाण्यातील भेंडवळ घटमांडणीमधून यंदा देशावर मोठे संकट, राजकीय तणाव आणि युद्धजन्य परिस्थितीचा इशारा देण्यात आला आहे. पावसाची आणि शेतीची स्थिती अनिश्चित राहणार असल्याचेही सांगितले गेले आहे.
वर्षभर देशावर युद्धाचे सावट असेल, पण युद्ध होणार आहे. राजा म्हणजेच पंतप्रधान तणावात राहतील. पृथ्वीचा काही भाग नष्ट होईल. युद्धजन्य परिस्थिती होईल मात्र युद्ध होणार नाही. असे भाकीत भेंडवळने वर्तवले आहे. देशात पाणी आणि पाऊस याची अनिश्चिता असेल, असे भाकितही वर्तवण्यात आले.
बुलढाण्यात (Buldhana District) पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवळ या गावात 370 वर्षापासून प्राचीन अशी भेंडवळची परांपरा आहे. ऐतिहासिक आणि मोठं संस्कृतिक महत्व असलेल्या भेंडवळची अक्षय्य तृतीय्येला घटमांडणी होते अन् दुसऱ्या दिवशी भाकीत वर्तवले जाते. आज सकाळी सूर्योदय होण्याआधी भेंडवळचे भाकीत वर्तवण्यात आले.
देशावर मोठं संकट -
साडेतीनशे वर्षांपूर्वीची परंपरा कायम ठेवत आज भेंडवळ येथे बाकी वर्तविण्यात आली. पुंजाजी महाराज यांनी सांगितले की, यंदा पिकांची परिस्थिती सर्वसाधारण राहील, तर पाऊसही सर्वसाधारणच पडेल, परंतु अनिश्चितता जास्त दिसून येईल. भाकितातून देशावर मोठे संकट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याचा धोका असून, राजकीय तणाव वाढेल, असे संकेत आहेत. तसेच, पृथ्वीचा काही भाग नष्ट होण्याची भीतीही या भाकितातून व्यक्त करण्यात आली आहे.
पावसाची स्थिती कशी असेल?
भेंडवळ येथील भाकितानुसार, यंदा पावसाची स्थिती सर्वसाधारण राहील, परंतु त्यात अनिश्चितता जास्त असेल. महाराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिकांच्या वाढीसाठी आवश्यक पाऊस हा देखील सर्वसाधारण पातळीवर राहील, परंतु त्यात अनिश्चितता जास्त असेल. याचा अर्थ, काही ठिकाणी पिकांना योग्य पाणी मिळेल, तर काही भागात पावसाच्या अनियमिततेमुळे पिकांवर परिणाम होऊ शकतो. शेती उत्पादनात स्थिरता राहील, परंतु अपेक्षित वाढ होण्याची शक्यता कमी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.