Padma Awards 2024 Winners List Saam Tv
मनोरंजन बातम्या

Padma Awards 2024: अभिनेते चिरंजीवी आणि वैजयंतीमाला यांना पद्मविभूषण पुरस्काराची घोषणा; संगीतकार प्यारेलाल, मिथून चक्रवर्ती यांचाही होणार गौरव

Padma Awards 2024 Winners: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला यंदाच्या वर्षी दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. विविध क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

Chetan Bodke

Padma Awards 2024 Winners List

प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day 2024) पूर्वसंध्येला यंदाच्या वर्षी दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची (Padma Awards) घोषणा करण्यात आली आहे. विविध क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या यादीमध्ये देशाचे माजी राष्ट्रपती व्यंकय्या नायडूंसह (M. Venkaiah Naidu) साऊथ सुपरस्टार चिरंजिवी (Chiranjeevi) यांना पद्मविभूषण पुरस्काराने तर संगीतकार प्यारेलाल आणि अभिनेता मिथून चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

Chiranjeevi

चिरंजीवी - पद्मविभूषण

टॉलिवूड सुपरस्टार चिरंजीवी गेल्या अनेक वर्षांपासून दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा एक प्रसिद्ध चेहरा आहे. १९८२ पासून चिरंजीवी सिनेसृष्टीमध्ये सक्रिय आहे. गेल्या ४० वर्षांच्या सिनेकारकिर्दिमध्ये त्यांनी चाहत्यांचे निखळ मनोरंजन केले आहे. आज ते ६८ वर्षांचे आहेत. फक्त भारतातच नाही तर, जगभरामध्ये चिरंजीवी यांचा मोठा चाहतावर्ग आहे.

Vyjayanthimala

वैजयंतीमाला - पद्मविभूषण

बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्धी अभिनेत्री आणि नृत्यांगना वैजयंती माला यांना कलाक्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल पद्मविभूषणने सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. आज त्या ९० वर्षांच्या असून ५० ते ६०च्या दशकामध्ये त्यांनी अभिनयासोबत डान्स क्षेत्रात त्यांनी आपले नशीब आजमावले. राज कपूर, दिलीप कुमार यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत वैजयंतीमाला यांनी काम केले आहे.

Padma Subrahmanyam

पद्मा सुब्रमण्यम- पद्म विभूषण

पद्मा सुब्रमण्यम दक्षिणेतील प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना आहे. त्या 80 वर्षांच्या असून त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि शास्त्रीय नृत्यासाठी कालिदास पुरस्कारही मिळाला आहे.

Usha Uthup

उषा उत्थुप- पद्मभूषण

उषा उत्थुप यांना संगीत सिनेसृष्टीमध्ये दीर्घकालीन योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत पॉप संगीताला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या म्हणून उषा उत्थुप यांचं नाव घेतलं जातं. उषा उत्थुप मुळच्या मुंबईकर आहेत. त्यांचा आवाज आणि त्यांचा लूकच आज त्यांची ओळख बनला आहे. त्यांनी अनेक चित्रपटांना आपला आवाज दिला आहे.

Mithun Chakraborty

मिथुन चक्रवर्ती- पद्मभूषण

मिथुन चक्रवर्ती यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांना पुर्वी राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. आपल्या सिनेकरिअरमध्ये त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या अभिनयासोबतच त्यांच्या खास डान्सशैलीनेही चाहत्यांचे मन जिंकले. मिथुन यांना आपल्या सिनेकारकिर्दीत एकूण 3 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

Pyarelal

प्यारेलाल शर्मा- पद्मभूषण

प्यारेलाल आणि लक्ष्मीकांत कुडाळकर यांची जोडी आजही संगीत विश्वात लोकप्रिय आहे. या दोघांनी इंडस्ट्रीत अनेक चित्रपटातील गाण्यांना संगीत दिले आहे. यामध्ये ड्रीम गर्ल, शोर, दो रास्ते, मंचली, बॉबी, अमर अकबर अँथनी, मिस्टर इंडिया, तेजाब, चालबाज आणि हम यासह अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

SCROLL FOR NEXT