Jaideep Ahlawat SAAM TV
मनोरंजन बातम्या

Jaideep Ahlawat : 'पाताल लोक २' फेम अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर; जयदीप अहलावतच्या वडिलांचे निधन

Jaideep Ahlawat Father Passes Away : 'पाताल लोक २' चा मुख्य अभिनेता जयदीप अहलावतवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. सविस्तर माहिती जाणून घ्या.

Shreya Maskar

लोकप्रिय वेब सीरिज 'पाताल लोक 2' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र सध्या 'पाताल लोक' सीरिज मुख्य अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 'पाताल लोक' अभिनेता जयदीप अहलावतच्या (Jaideep Ahlawat) वडिलांचे निधन झाले आहे. जयदीपच्या वडिलांचे मुंबईत निधन झाले आहे. 13 जानेवारीला ही दुःखद घटना घडली आहे.

अभिनेत्याच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, "जयदीप अहलावत यांच्या वडिलांचे मुंबईत 13 जानेवारीला निधन झाले आहे. हे सांगताना आम्हाला अतिशय दुःख होत आहे. या काळात जयदीप आणि त्यांचे कुटुंब या कठीण प्रसंगाचा सामना करत आहे. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात गोपनीयता राखावी अशी विनंती... तुमच्या सहकार्याबद्दल आणि प्रार्थनांसाठी आभारी..."-

मीडिया रिपोर्टनुसार, जयदीपच्या वडिलांचे अंत्यसंस्कार हरियाणा या त्यांच्या मूळ गावी होणार आहेत. जयदीपने हरियाणातच शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुण्याच्या 'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' प्रवेश घेतला. जयदीपने एका मुलाखतीत सांगितले होते की, "माझे वडील कायम माझ्या अभिनय क्षेत्राला आणि माझ्या स्वप्नांना पाठिंबा देत. त्यांनी मला अभिनयासाठी कधीच नकार दिला नाही."

जयदीपने 'खट्टा मीठा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्याला खरी ओळख 'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटातून मिळाली. आता 'पाताल लोक' सीरिजच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या घरात पोहचला आहे. जयदीपने आजवर महाराज, थ्री ऑफ अस, राजी अशा अनेक चित्रपटांत काम केले आहे.

जयदीप अहलावतने कायमच आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 'पाताल लोक 2' 17 जानेवारी 2024 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पाताल लोक 2' हा 'पाताल लोक 'सीरिजचा दुसरा भाग आहे. या सीरिजचा पहिला भाग देखील खूप गाजला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : धनंजय मुंडे यांच्या भाषणानंतर करुणा मुंडे यांची प्रतिक्रिया

Gold Rate: धनत्रयोदशीला सुवर्णनगरीत सोनं स्वस्त; ३००० रुपयांची घसरण, ग्राहकांची गर्दीच गर्दी

Bigg Boss 19 : बापाने केली लेकाची कानउघाडणी; सलमान खानने अमाल मलिकला दिली शेवटीची वॉर्निंग, पाहा VIDEO

Kurkurit Chakali: कुरकुरीत चकली कशी बनवायची?

धारदार हत्याराने तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कापला अन्...; रक्ताच्या थारोळ्यात पडला, सशंय कुणावर?

SCROLL FOR NEXT