Madhuri Dixit : 'धक-धक गर्ल'नं खरेदी केली आलिशान कार; किंमत ऐकून डोळे भिरभिरतील, पाहा पहिली झलक

Madhuri Dixit New Car Price : बॉलिवूडची 'धक-धक गर्ल' अभिनेत्री माधुरी दीक्षितने नवीन आलिशान कार खरेदी केली आहे. गाडीच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या लग्जरी कारची किंमत जाणून घ्या.
Madhuri Dixit New Car Price
Madhuri DixitSAAM TV
Published On

बॉलिवूडची 'धक धक गर्ल' अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) नेहमी तिच्या लूक , अभिनयासाठी ओळखली जाते. ती आपल्या कातिल अदांनी चाहत्यांना घायाळ करते. तिने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. सध्या माधुरी दीक्षित एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने एक आलिशान गाडी खरेदी केली आहे. या गाडीची पहिली झलक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. माधुरी दीक्षितला कार खूप आवडतात.

अभिनेत्री माधुरी दीक्षित य़ांनी नुकतीच फेरारी 296 GTS कार खरेदी केली आहे. गाडीच्या खरेदीसाठी स्वतः माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने गेले होते. कार घेऊन येताना माधुरीने एक खास लूक केला होता. ज्याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. माधुरीने निळ्या रंगाचा सुंदर शिमरी ड्रेस परिधान केला होता. तर डॉ. नेने 'सूट-बूट'मध्ये पाहायला मिळाले. नव्या कारच्या स्वागतासाठी दोघेही सुंदर नटून आले होते. गाडीप्रमाणे ते देखील चमकत होते.

माधुरी दीक्षितच्या नवीन कारची किंमत किती?

माधुरी दीक्षित यांच्या या नव्याकोऱ्या कारचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. माधुरीच्या नव्या कारचा रंग रोसो कोर्सा आहे. ती दिसायला खूप आकर्षक आहे. ही लग्जरी कार एक नाही दोन नाही तर तब्बल ६.२४ कोटी रुपयांची आहे. या कारचे फीचर्स खूप भन्नाट आहेत. माधुरी दीक्षितकडे या व्यतिरिक्त अनेक आलिशान कार आहेत. ज्यात मर्सिडीज, रेंज रोव्हर वोग यांचा समावेश आहे. आता यात फेरारीची भर पडली आहे.

अलिकडेच माधुरी दीक्षित 'भूल भुलैया -३'मध्ये पाहायला मिळाली. तिने आपल्या अभिनयाने आणि डान्सने चाहत्यांना वेड लावले आहे. माधुरी दीक्षितचा मोठा चाहता वर्ग आहे. तिचे इन्स्टाग्राम 39.7 फॉलोअर्स आहेत. ती इन्स्टाग्रामवर आपल्या वेगवेगळ्या लूकचे फोटो शेअर करत असते. चाहते आता माधुरी दीक्षितच्या आगामी प्रोजेक्टची वाट पाहत आहे. तिने मराठी, हिंदी चित्रपटातील आपला दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Madhuri Dixit New Car Price
Pooja Sawant : मराठमोळा शृंगार अन् हलव्याचे दागिने; परदेशात साजरी केली पूजानं मकर संक्रांत, पाहा नवऱ्यासोबतचा खास VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com