BMW Motorrad Price Hike : नवीन वर्षात बीएमडब्लू, मर्सिडीज बेंझ महागणार; GLA मॉडेलसाठी मोजावी लागेल इतकी किंमत

BMW - Mercedes Price Update News : मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू सारख्या लक्झरी कार कंपन्यांनी आधीच किमती वाढवल्या असताना आता नवीन वर्षापासून महागड्या आणि प्रीमियम मोटरसायकलच्या किमतीही वाढणार आहेत.
BMW - Mercedes
BMW - MercedesSaamTv
Published On

मुंबई : वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर सुरू झाला आहे. हा महिना संपल्यानंतर नवीन वर्ष 2025 दार ठोठावणार आहे. हे नवीन वर्ष अनेक अर्थाने महत्त्वाचे असणार आहेत. नवीन वर्षात तुम्ही वाहन खरेदीचा विचार करीत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक ऑटोमोबाईल उत्पादनांच्या किमतीत वाढ होणार आहे.

मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू सारख्या लक्झरी कार कंपन्यांनी आधीच किमती वाढवल्या असताना आता महागड्या आणि प्रीमियम मोटरसायकलच्या किमतीही वाढणार आहेत. आपल्या दर्जेदार उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेली जर्मन ऑटोमोबाईल कंपनी BMW च्या दुचाकी युनिट BMW Motorrad ने देखील 1 जानेवारी 2025 पासून आपल्या सर्व उत्पादनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे.

जानेवारीपासून महागणार बीएमडब्ल्यू मोटोरॅडची उत्पादने 

कंपनीने जाहीर केले आहे की जानेवारी 2025 पासून तिच्या सर्व मॉडेल्सच्या किमती 2.5 टक्कांनी वाढतील. उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाची वाढती किंमत आणि महागाईचा दबाव लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

BMW - Mercedes
50 वर्षांनंतर सापडलं Asthma वर औषध! पहिल्याच डोसने मिळेल आराम?

बीएमडब्ल्यू मोटोरॅडने शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या निर्णयामुळे कंपनीला त्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता, कामगिरी आणि प्रीमियम ब्रँडचा अनुभव राखण्यात मदत होईल. आपल्याला माहितीच आहे की, बीएमडब्लू तीच्या प्रिमीयम उत्पादनासाठी ओळखली जाते. तीच्या दुचाकी वाहनांची किंमत 5 लाखांपासून सुरू होते. बीएमडब्लूचे वाहन वापरणारा एक वेगळा वर्ग आहे.

BMW - Mercedes
Electric Car : सिंगल चार्जमध्ये 200 किमी धावणार, ही तीन चाकी कार ठरू शकते 'गेम चेंजर', किंमत किती?

मर्सिडीज बेंझ कारही महागणार आहेत

प्रिमीयम सेगमेंटमध्ये मर्सिडीज बेंझ एक जागतीक कंपनी आहे. बीएमडब्ल्यूसोबतच मर्सिडीज बेंझनेही आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. 1 जानेवारी 2025 पासून मर्सिडीज कारच्या किमती 3 टक्कांपर्यंत वाढतील. मर्सिडीज-बेंझ इंडियाने सांगितले की, भारतातील GLC मॉडेलच्या किमती 2 लाख रुपयांनी वाढवल्या जातील आणि Mercedes-Maybach S 680 (Maybach S 680 Luxury Limousine) च्या किमती 9 लाख रुपयांनी वाढल्या जातील.

BMW - Mercedes
Fashion Tips: हटके लूक दिसण्यासाठी तुमच्या कपड्यांच्या रंगासोबत योग्य लिपस्टिकची करा निवड...

उत्पादन खर्च, महागाई आणि उच्च परिचालन खर्च लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. अद्याप आणखी स्पर्धात्मक कंपन्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही मात्र बीएमडब्लू आणि मर्सिडीजच्या घोणनेनंतर इतर कंपन्याही दरवाढीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. 

Edited By- नितीश गाडगे

BMW - Mercedes
Coconut Water: हिवाळ्यात नारळ पाणी प्यावे की नाही? 'या' ऋतूतील त्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com