asthma treatment
Asthma saam Tv

50 वर्षांनंतर सापडलं Asthma वर औषध! पहिल्याच डोसने मिळेल आराम?

Asthma Treatment: दमा आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) हे आजार बऱ्याच लोकांना होत असतात.
Published on

दमा आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) हे आजार बऱ्याच लोकांना होत असतात. या समस्येवर अद्याप इलाजही नव्हता. एखाद्याला हा आजार झाला की, आयुष्यभर तो सहन करावा लागत होता. मात्र आता या रुग्णांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. ५० वर्षांमध्ये पहिल्यांदाच Asthma या आजारावरचे औषध सापडलेले आहे.

वैज्ञानिकांच्या टीमला त्याच्या उपचारात मोठे यश मिळाले आहे. शास्त्रज्ञांनी एक प्रभावी इंजेक्शन शोधून काढले आहे जे आत्तापर्यंत दिलेल्या स्टिरॉइड गोळ्यांपेक्षा अधिक प्रभावी आहेच पण त्याच्या मदतीने पुढील उपचारांची गरज ३० टक्क्यांनी कमी करता येऊ शकते. अस्थमा सीओपीडी रुग्णांसाठी याला 'गेम चेंजर' मानले जात आहे.

asthma treatment
सावधान! हिवाळ्यात Vitamin D ची कमतरता तुमच्या हाडांना बनवतेय खिळखिळं? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

बेनरालिझुमॅब इंजेक्शनमुळे धोका कमी होईल

50 वर्षांतील सर्वात मोठे यश श्वसन रोगांवर उपचार करण्याच्या दिशेने पाहिले जात आहे. द लॅन्सेट रेस्पिरेटरी मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, अस्थमा-सीओपीडी रुग्णांना उपचारासाठी एक इंजेक्शन दिले जाईल. ज्याचे परिणाम खूपच आशादायक असल्याचे दिसून आले आहे. Benralizumab नावाचे हे इंजेक्शन मोनोक्लोनल अँटीबॉडीचे काम करते. हे इओसिनोफिल नावाच्या पांढऱ्या रक्त पेशींवर लक्ष केंद्रीत करते. त्यामुळे फुफ्फुसातील जळजळ कमी होण्यास मदत होते. अस्थमा-सीओपीडी रुग्णांना फुफ्फुसात जळजळ झाल्यामुळे आजार गंभीर होण्याचा धोका असतो.

डॉक्टर म्हणतात की, 'हे सध्याच्या उपचार पद्धतींपेक्षा 30% जास्त प्रभावी आहे प्रभावी विद्यमान उपचार पद्धतींपेक्षा ते 30 टक्क्यांपर्यंत अधिक प्रभावी असल्याचे' तज्ज्ञांना आढळून आले आहे. चाचणीमध्ये 158 लोकांचा समावेश होता ज्यांना अस्थमा किंवा सीओपीडी हल्ल्यासाठी आपत्कालीन वैद्यकीय मदतीची आवश्यकता होती. या इंजेक्शनमुळे लक्षणे आणि आरोग्यविषयक गुंतागुंत कमी होण्यास मदत झाली.

अभ्यासात काय आढळले?

या अभ्यासासाठी संशोधकांनी रुग्णांना तीन गटात विभागले. एका गटाला बेनरालिझुमॅब इंजेक्शन आणि डमी गोळ्या देण्यात आल्या, दुसऱ्या गटाला मानक काळजी (प्रिडनिसोलोन 30 मिग्रॅ दररोज पाच दिवस) आणि तिसऱ्या गटाला मानक काळजीसह बेनरालिझुमॅब इंजेक्शन देण्यात आले. अभ्यासात असा निष्कर्ष काढण्यात आला की 28 दिवसांनंतर, बेनरालिझुमॅब इंजेक्शन घेणाऱ्यांमध्ये खोकला, घरघर आणि दमा यांसारख्या लक्षणांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली. त्याच वेळी, 90 दिवसांनंतर, बेनरालिझुमॅब गटातील लोक इतर गटांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या बरे झाले होते.

तज्ञ काय म्हणतात?

किंग्ज कॉलेज लंडनच्या प्रोफेसर मोना बाफडेल म्हणतात, 'दमा आणि सीओपीडी असलेल्या लोकांसाठी हे गेम चेंजर असू शकते. या दोन आजारांमुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू होतो, तरीही 50 वर्षांत अस्थमा आणि सीओपीडीच्या उपचारांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पाच दशकांतील हे सर्वात मोठे यश आहे. आम्हाला आशा आहे की हा महत्त्वाचा अभ्यास भविष्यात दमा आणि COPD वर उपचार करण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणेल' जगभरात या आजारांनी जगणाऱ्या एक अब्जाहून अधिक लोकांचे आरोग्य सुधारेल.

Written By: Sakshi Jadhav

asthma treatment
Winter Skin Care: हिवाळ्यात चेहरा सतत कोरडा पडतोय? मग एकदा करा 'या' घरगुती फेस मास्कचा वापर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com