CDSCO: उठसूट Paracetamol घेत असाल तर व्हा सावध; शुगर-बीपीच्या औषधांसह ५३ औषधं क्वालिटी चेकमध्ये फेल

CDSCO: सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने काही औषधांचा खुलासा केला आहे. CDSCO ने रिपोर्टमध्ये जारी केलेली ही औषधं क्वालिटी चेकमध्ये फेल ठरलीयेत.
Paracetamol 53 medicines fail
Paracetamol 53 medicines failsaam tv
Published On

ताप आला किंवा बरं वाटतं नसेल तर तुम्ही उठसुट पॅरासिटामोलचा वापर करत असाल तर आजंच असं करणं थांबवा. याचं कारण म्हणजे सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) नुकताच एक अहवाल जाहीर केला आहे. या अहवालामध्ये अशा काही औषधांचा खुलासा केला आहे, जी सामान्यपणे अधिक प्रमाणात वापरली जातात. मुख्य गोष्ट म्हणजे, CDSCO ने रिपोर्टमध्ये जारी केलेली ही औषधं क्वालिटी चेकमध्ये फेल ठरलीयेत.

CDSCO ने जाहीर केलेल्या अहवालात पॅरासिटामॉल, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी यांच्या गोळ्यांचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे वारंवार तुम्ही या गोळ्यांचा वापर करत असाल तर सावध व्हा.

औषधांचा दर्जा तपासणीत अपयशी ठरली औषधं

सीडीएससीओने क्वालिटी चेकमध्ये फेल ठरलेल्या औषधांमध्ये पॅन्टोसिड गोळ्यांचाही समावेश आहे. हे औषध ऍसिड रिफ्लेक्सवर उपचार करण्यासाठी प्रभावी मानलं जातं. हे औषध सन फार्मा कंपनीने बनवलं आहे. याशिवाय कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीच्या गोळ्याही क्वालिटी चेकमध्ये अपयशी ठरल्याचं दिसून आलं.

कोणती औषधं ठरली फेल

पॅरासिटामॉल, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी यांच्या गोळ्या क्वालिटी चेकमध्ये अपयशी ठरल्या आहेत. यामध्ये शेलकल आणि पल्मोसिल इंजेक्शन देखील फेल ठरल्याचं समोर आलं आहे. सामान्यपणे ही औषधं उच्च रक्तदाबाच्या उपचारांमध्ये वापरली जातात.

सीडीएससीओ जाहीर केली लिस्ट

सीडीएससीओने बोगस, भेसळयुक्त आणि चुकीच्या ब्रँडिंगची औषधं, ठराविक वैद्यकीय उपकरणं, लसी आणि सौंदर्यप्रसाधनांची यादी जाहीर केलीये. यामध्ये कोण-कोणत्या गोष्टींचा समावेळ आहे, हे पाहूयात.

  • पुलमोसिल (सिल्डेनाफिल इंजेक्शन)

  • पॅन्टोसिड (पॅन्टोप्राझोल टॅब्लेट आयपी)

  • उर्सोकॉल 300 ( पित्ताशयाची खड्यांवरील उपचांरासाठी याचा वापर केला जातो )

याशिवाय लिव्हरच्या उपचारांमध्ये देखील याचा वापर केला जातो. हे औषध सन फार्मा कंपनीचं आहे. याशिवाय टेलमा एच, डिफ्लाझाकोर्ट गोळ्या यादेखील फेल ठरल्याचं दिसून आल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com