Marathi Serial saam tv
मनोरंजन बातम्या

Marathi Serial : मालिका बंद झाल्याचं कलाकारांनाच माहित नाही, अभिनेत्रीनं केला धक्कादायक खुलासा

Paaru Serial Off Air : लोकप्रिय मराठी मालिकेने अचानक प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिका अचानक संपल्याचे कारण मुख्य अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना सांगितले आहे.

Shreya Maskar

'पारू' मराठी मालिका अचानक बंद झाली.

कोणतीही पूर्व कल्पना न देता मालिका बंद केल्याचा धक्कादायक खुलासा मुख्य अभिनेत्रीने केला.

अवघ्या दोन वर्षात मालिका बंद झाली.

मराठी अभिनेत्री शरयू सोनावणे आणि अभिनेता प्रसाद जवादे मुख्य भूमिकेत असलेली मराठी मालिका 'पारू' बंद झाली आहे. ही मालिका 'झी मराठी' वाहिनीवर 12 फेब्रुवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेने खूप कमी वेळात प्रेक्षकांचे मन जिंकले. ही मालिका अचानक बंद करण्यात आली. मालिकेचा शेवट न दाखवता 10 फेब्रुवारीनंतर मालिकेचा एकही एपिसोड प्रदर्शित झाला नाही.

'पारू' मालिका अचानक बंद झाल्यामुळे सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरू झाल्या. प्रेक्षकही आता प्रचंड नाराज झाले आहेत. अशात मालिकेच्या मुख्य अभिनेत्री शरयू सोनावणे सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून चाहत्यांना एक महत्त्वाची माहिती दिली आहे. शरयूने व्हिडीओतून प्रेक्षकांची माफी मागितली आहे. शरयू व्हिडीओत नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊयात.

शरयू सोनावणे

"नमस्कार! मी शरयू सोनावणे म्हणजेच तुम्हा सगळ्यांची लाडकी पारू... गेल्या काही दिवसांपासून मेसेज, फोन आले आहेत, विचारतात की, 'पारू' मालिका बंद का झाली? तर, मला तुम्हाला सांगायचं आहे की, 10 फेब्रुवारीला 'पारू' मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित करण्यात आला. सातशे भागांच्या प्रवासात तुम्ही आम्हाला साथ दिली, भरभरून प्रेम केले. सतत दोन वर्षे टीआरपीमध्ये नंबर 1 वर असलेली मालिका अचानक बंद होणे ही अनपेक्षित आणि धक्कादायक गोष्ट आहे.

'पारू' मालिका बंद होतेय याची पूर्व कल्पना आम्हाला निर्मात्यांकडून दिली गेली नव्हती. आजपर्यंत मराठी इंडस्ट्रीत अशा कुठल्याच मालिकेचा शेवट झाला नाही जसा 'पारू' मालिकेचा झाला, त्यामुळे मी तुम्हा सर्वांची मनापासून माफी मागते की, या मालिकेचा शेवटचा भागही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. प्रदर्शित करू शकलो नाही. काही तांत्रिक अडचणी आणि प्रोडक्शनच्या समस्येमुळे 'पारू' मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित नाही झाला.

"आता 'पारू' मालिका बंद होत असली तरीही, आपल्यातील नातं, तुमचं माझ्यावरचे प्रेम हे कायम माझ्यासोबत राहील.'पारू'च्या सुख-दु:खात तुम्ही कायम माझ्या सोबत होतात यासाठी मी तुमची ऋणी असेन. आता लवकरच भेटुया एका नव्या रुपात, नव्या भूमिकेत...तोपर्यंत तुमचे आशीर्वाद आणि तुमचं माझ्यावर असलेलं प्रेम हे कायम राहू दे...तुमची मनापासून माफी मागते. तुमचे खूप आभार...तुमची पारू "

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

शरयूने व्हिडीओला एक खास कॅप्शन दिले आहे. तिने लिहिलं की, "निरोप...एका सुंदर प्रवासाचा!" शरयूने शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत. "कधी संपली कळलं पण नाही", "मिस यू पारू", "नको बंद पडायला हवी होती पारू मालिका, खूप छान वाटायची, बघून काहीतरी शिकायला भेटायचे..." अशा कमेंट्स व्हिडीओवर येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सलग तीन दिवसांच्या सुट्टीमुळे रायगड मधील समुद्र किनारे हाऊसफुल

Kideny Health: किडनीचा त्रास आहे? उन्हाळ्यात ही 5 फळे खाण्यापूर्वी 10 वेळा विचार करा

Heart Attack: हार्ट अटॅक येण्यापूर्वी ४८ तास अगोदर शरीर देतं हे संकेत, वेळीच ओळखा

Mango Price : आनंदवार्ता! हापूसचे दर घसरले, १ डझन पेटीची किती आहे किंमत? जाणून घ्या

Aadhaar Card Update: आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल

SCROLL FOR NEXT