Orry Saam Tv
मनोरंजन बातम्या

Orry Police Case : ऑरीची एक चूक अन् त्याच्यासह ८ जणांवर FIR; वैष्णो देवी मंदिर परिसरात असं काय केलं? वाचा सविस्तर

Orry Latest News : ऑरी आणि त्याच्या मित्रावर एफआयआर नोंदवण्यात आला आहे. वैष्णो देवी मंदिर परिसरात दारुचे सेवन केल्याने त्याच्यासहित त्याच्या मित्रावर एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

Vishal Gangurde

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये नेहमी दिसणारा ऑरी अडचणीत सापडला आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी जम्मूच्या कटरामधील एका हॉटेलमध्ये दारू प्यायल्याने त्याच्यासह ८ जणांविरोधात एफआयआर नोंदवला आहे. यामध्ये ऑरीच्या नावाचाही समावेश आहे. कारण, त्या परिसरात दारु पिण्यास बंदी आहे.

कटरामध्ये वैष्णो देवी मंदिर आहे. कटरा परिसरात पवित्र स्थळ असल्याने परिसरात दारु पिण्यास बंदी आहे. रिपोर्टनुसार, ऑरी आणि त्यांचा मित्रांना सांगण्यात आलं होतं की, या परिसरात दारू पिणे आणि नॉनव्हेज खाण्यास बंदी आहे. तरीही त्याच्या मित्रांनी हॉटेलमध्ये दारुचे सेवन केल्याचं आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

ऑरी आणि त्याच्या मित्रांनी १५ मार्च रोजी हॉटेलमध्ये दारुचं सेवन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कटरा पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे. एफआयआरमध्ये ऑरीच्या व्यतिरिक्त दर्शन सिंह, पार्थ रैना, रितिक सिंह, ऋषि दत्ता, रक्षिता भोगल, शगुना कोहली आणि अनसतासिला अर्जतमस्कीनाच्या नावाचा समावेश आहे. या लोकांच्या विरोधातही एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

ऑरीने नुकताच एक व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. त्यात त्याचे मित्र पार्टी करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, एका टेबलावर दारूच्या बाटल्या आहेत.

दरम्यान, पोलिसांनी कायदा मोडणाऱ्यांना कठोर संदेश दिला आहे. जे लोक कायदा मोडणार, कायद्याचं पालन करणार नाही. त्यांना परिणाम भोगावे लागतील. कायदा मोडण्याचा गुन्हा सहन केला जाणार नसल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

फोटोमध्ये नेमकं काय आहे?

ऑरीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. त्यात त्याचे मित्र एका हॉटेलमध्ये पार्टी करताना दिसत आहेत. एका टेबलवर दारुच्या बाटल्या ठेवलेल्या दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये सोफ्यावर ऑरी बसलेला पाहायला मिळत आहे. ऑरीने दुसऱ्या एका स्टोरीमध्ये वैष्णा देवी कटरा या भागाचा लोकेशन टॅग दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pregnancy Mental Health: गर्भधारणेदरम्यान मानसिक तणाव टाळण्यासाठी 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Salman Khan : सलमान खाननं 'बिग बॉस 19'साठी किती घेतलं मानधन? आकडा वाचून पायाखालची जमीन सरकेल

Manikrao Kokate: कृषीमंत्री कोकाटेंवर कारवाईची टांगती तलवार? राजीनाम्याचं काऊंटडाऊन सुरू? CM दिल्ली दौऱ्यावर, नेमकं काय घडलं?

Diabetes without blood test: शरीरात हे ६ बदल दिसले तर समजा मधुमेह झालाय; ब्लड टेस्ट न करताही डायबेटीजचा धोका येईल लक्षात

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT