Pushkar Shrotri Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pushkar Shrotri: पुष्करचा यंदाचा वाढदिवस ठरणार खास, 'आज्जीबाई जोरात’ नाटकाद्वारे पुष्कर गाठणार वेगळी ‘उंची’

Aajji Bai Jorat Marathi Theatre Play: अभिनेता पुष्कर श्रोत्री ‘हॅप्पी गो लकी’ स्वभामुळे प्रत्येकाला जवळचे वाटतात. चित्रपट, मालिका, नाटक अशा साऱ्या माध्यमांमध्ये लीलया वावरणाऱ्या पुष्करच्या अभिनय कारकिर्दीत ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकाने भन्नाट योग जुळून आणला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Pushkar Shrotri:

अभिनेता पुष्कर श्रोत्री ‘हॅप्पी गो लकी’ स्वभामुळे प्रत्येकाला जवळचे वाटतात. चित्रपट, मालिका, नाटक अशा साऱ्या माध्यमांमध्ये लीलया वावरणाऱ्या पुष्करच्या अभिनय कारकिर्दीत ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकाने भन्नाट योग जुळून आणला आहे.

अभिनेता पुष्कर श्रोत्री यांचा ३० एप्रिलला वाढदिवस असतो. यंदा आपला ५५वा वाढदिवस साजरा करत असताना याच दिवशी रंगभूमीवरील आपल्या ५५ व्या नाटकाचा शुभारंभ ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकाने करणार आहे. आपल्या ३२ वर्षाच्या अभिनय कारकिर्दीत रसिकांची मनं जिंकणारे पुष्कर या नाटकात ‘अतरंगी’ भूमिकेत दिसणार आहे. या नाटकाद्वारे पुष्कर वेगळी ‘उंची’ गाठणार आहेत. ती उंची कशी गाठणार? हे पाहण्यासाठी ‘आज्जीबाई जोरात’ हे नाटक पाहावं लागणार आहे.

‘पहिल्यांदाच बालनाट्यात काम करायला मिळणं आणि वेगळा रोल जो मला वेगळ्या उंचीवर नेणार आहे. ते करण्यासाठी उत्सुक असल्याचे पुष्कर यांनी सांगितले’. माझ्यासाठी ३० एप्रिल तारीख खास आहेच पण आमच्या ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकासाठी सुद्धा तारीख खास ठरावी. नाट्यरसिकांनी उत्तम प्रतिसाद देत ‘आज्जीबाई जोरात’चे जोरात स्वागत करावे, अशी आशा पुष्कर श्रोत्री यांनी व्यक्त केली.

लेखक-दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन ‘आज्जीबाई जोरात’ हे नवं कोरं AI बालनाट्यरंगभूमीवर घेऊन येतायेत. जिगीषा-अष्टविनायक संस्थेची निर्मिती असलेल्या ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकात सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत, पुष्कर श्रोत्री, जयवंत वाडकर, मुग्धा गोडबोले, अभिनय बेर्डे अशी कलाकारांची फळी आहे. हे नाटक विनोदाच्या अंगानं जाणारी फँटसी आहे. दिलीप जाधव, चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी या नाटकाचे निर्माते आहेत. नेपथ्य प्रदीप मुळ्ये तर वेशभूषेची जबाबदारी कल्याणी कुलकर्णी-गुगळे यांनी सांभाळली आहे. संगीत सौरभ भालेराव तर नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी...' गणेश गल्ली, तेजुकाया अन्.. मुंबईतील गणरायाच्या विसर्जनाला सुरूवात

Ganpati Visarjan 2025: मुंबई ते दिल्ली गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी 'हे' आहेत शुभ मुहूर्त; जाणून घ्या सविस्तर

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाच्या दिवशी चुकूनही 'या' गोष्टी करू नका; 10 दिवसांची पुजा ठरेल व्यर्थ

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT