'समसे कातिल गौतमी पाटील' हे वाक्य आज संपूर्ण महाराष्ट्रभर ऐकायला मिळत आहे. नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) आपल्या तालावर संपूर्ण महाराष्ट्राला नाचवत आहे. गौतमी पाटीलची एक झलक आणि डान्स पाहण्यासाठी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण मोठी गर्दी करतात. गावा-खेड्यांमध्ये अगदी कोणाचा वाढदिवस असो, लग्न असो वा इतर कार्यक्रम गौतमीला आवर्जुन बोलावले जाते. गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमाची चर्चा होतेच. पण आता गौतमी पाटील वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. त्यामागचे कारण म्हणजे कोल्हापूरनंतर आता सिंधुदुर्गमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे.
गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटलं की, हजारोंच्या संख्येने तिचे चाहते गर्दी करतात. गौतमी पाटील यावेळी कार्यक्रमानिमित्त कोकणातील सिंधुदुर्गमध्ये जाणार होती. पण तिच्या या कार्यक्रमाला विरोध करण्यात आला आहे. सिंधुदुर्गातील कुडाळ आणि कणकवलीमध्ये गौतमीच्या डीजे डान्स शोचे आयोजित करण्यात आले होते. मात्र गौतमीच्या या कार्यक्रमाला विरोध करत नेटिझन्सनी टीकेची झोड सुरू केली. या कार्यक्रमाला होणारा विरोध लक्षात घेता आयोजकांनी तांत्रिक कारण देत कार्यक्रम रद्द केला आहे.
येत्या ८ ऑक्टोबरला कुडाळला गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून त्याला विरोध केला जात आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी टीका करत गौतमीच्या कार्यक्रमाला विरोध केला. सुसंस्कृत अशा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नृत्यांगणा गौतमी पाटीलचा डान्स होता कामा नये अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती. या विरोधाला लक्षात घेता या कार्यक्रमाच्या आयोजनकांनी मोठा निर्णय घेतला. अखेर काही तांत्रिक कारणासाठी गौतमीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याचे आयोजकांनी जाहीर केलं आहे.
गौतमी पाटील नेहमीच तिच्या डान्समुळे वादामध्ये सापडली आहे. तिच्या डान्स शोमुळे ती कायमच चर्चेत राहिली आहे. बऱ्याचदा गौतमीच्या कार्यक्रमात राडा झाल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर आता गौतमीला कोकणातून देखील धक्का बसला आहे. कोकणातील तिचे डान्स शो रद्द करण्यात आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.