Ram Charan: सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी अनवाणी पोहचला राम चरण, लूकने वेधलं सर्वांचं लक्ष; VIDEO व्हायरल

South Superstar Ram Charan: राम चरणने आज सकाळी मुंबईतल्या प्रभादेवी येथे असणाऱ्या सिद्धिविनायक मंदिरात (siddhivinayak temple) जाऊन बाप्पाचे दर्शन घेतलं.
Ram Charan Visit Siddhivinayak Temple
Ram Charan Visit Siddhivinayak TempleSaam Tv
Published On

Ram Charan Visit Siddhivinayak Temple:

साऊथचा सुपरस्टार राम चरण (Actor Ram Charan) सध्या मुंबईमध्ये आहे. नुकताच राम चरण मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाला होता. राम चरणला काळी कपडे आणि अनवाणी पाहून सर्वजण आश्चर्यचकीत झाले. कधी आपल्या लूक तर कधी आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असणारा राम चरण सध्या त्याच्या या नव्या लुकमुळे चर्चेत आला आहे. राम चरणने आज सकाळी मुंबईतल्या प्रभादेवी येथे असणाऱ्या सिद्धिविनायक मंदिरात (siddhivinayak temple) जाऊन बाप्पाचे दर्शन घेतलं. राम चरणचे फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत.

Ram Charan Visit Siddhivinayak Temple
Thalaivar 170 Star Cast: ‘थलायवर १७०’मध्ये बिग बी आणि रजनीकांत करणार एकत्र स्क्रिन शेअर, निर्मात्यांनी केली स्टारकास्टची घोषणा...

राम चरणचा नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकताच तो मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. राम चरण काळा कुर्ता-पायजमा, अनवाणी, डोक्यावर टिळा लावलेल्या लूकमध्ये दिसला. राम चरणच्या या लूकनेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सकाळी सिद्धिविनायक मंदिरात पोहचून त्याने गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. त्याचसोबत त्याने सिद्धिविनायक मंदिरात पूजा देखील केली. त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे.

राम चरणच्या चाहत्यांना त्याचा हा ब्लॅक कलरचा लूक खूप आवडला आहे. त्याचा नव्या लूकमधील हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. राम चरणची अनवाणी चालण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही राम चरण अनेकदा अनवाणी दिसला आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला जाण्यापूर्वीही राम चरण अनवाणी दिसला होता. तो एकदा गेटी गॅलेक्सी थिएटरच्या बाहेर याच अवतारात दिसला होता. यावेळीही त्यांने चप्पल घातली नव्हती.

मिळालेल्या माहितीनुसार, राम चरणने अयप्पाची दीक्षा घेतली आहे. दक्षिण भारतात ही एक परंपरा आहे. ज्याला अयप्पा दीक्षा म्हणतात. हा ४१ दिवसांचा अतिशय कठीण व्रत असतो. जेथे भगवान अय्यप्पाचे भक्त सर् मोह सोडून देतात आणि ब्रह्मचर्याचे पालन करतात. या काळात भाविकांना ४१ दिवस काळे वस्त्र परिधान करावे लागते. याशिवाय कोणीही मांसाहार खाऊ शकत नाही. याकाळात दाढी करू शकत नाही किंवा केस कापू शकत नाही. एवढेच नाही तर भाविकांना ४१ दिवस जमिनीवर झोपावे लागते.

Ram Charan Visit Siddhivinayak Temple
Rupali Bhosle Post: ‘माझ्या वाट्याला सिनेमे आलेच नाहीत’, ‘विनाकारण राजकारण’साठी ॲवॉर्ड मिळाल्यानंतर असं का म्हणाली रुपाली भोसले?

राम चरणच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सध्या राम चरणकडे अनेक चित्रपट आहेत. राम चरण लवचरच रवीना टंडनची मुलगी राशासोबत दिसणार आहे. हा एक तेलुगु चित्रपट असेल. ज्यामध्ये राशा तिच्यापेक्षा २० वर्षांनी मोठा अभिनेता राम चरणसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. याशिवाय राम चरण 'RC 17' मध्येही दिसणार आहे. मात्र, या चित्रपटाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. हा अभिनेता 'गेम चेंजर' या हाय-व्होल्टेज पॉलिटिकल थ्रिलरच्या माध्यमातून लवकरच भेटीला येणार आहे.

Ram Charan Visit Siddhivinayak Temple
Gautami Patil: गौतमी पाटीलला सिंधुदुर्गात नो एन्ट्री, नेमकं काय आहे कारण?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com