Nidhhi Agerwal  saam tv
मनोरंजन बातम्या

Nidhhi Agerwal : संतापजनक! धक्काबुक्की अन् गैरवर्तन केले; अभिनेत्रीला चाहत्यांकडून वाईट वागणूक, VIDEO पाहून राग अनावर होईल

Nidhhi Agerwal Viral video : प्रसिद्ध अभिनेत्री निधी अग्रवालसोबत हैदराबादमध्ये धक्कादायक प्रकार घडला. अभिनेत्रीसोबत चाहत्यांनी गैरवर्तन केले. तसेच धक्काबुक्की केली. नेमकं घडलं काय, पाहा.

Shreya Maskar

'द राजा साब' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चित्रपटातील एका गाण्याचा लाँचिंग इव्हेंट नुकताच पार पडला.

कार्यक्रमानंतर चाहत्यांनी निधी अग्रवालला पाहण्यासाठी गर्दी केली.

प्रसिद्ध अभिनेत्री निधी अग्रवालचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार पाहायला मिळत आहे. निधी अग्रवाल तिचा आगामी चित्रपट 'द राजा साब' मधील 'सहना सहना' गाण्याच्या लाँचिंग इव्हेंटमध्ये गेली होती. कार्यक्रम संपवून येताना तिच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला.

निधी अग्रवालच्या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहून शक्ता की, ती बाहेर येताच तिला चाहत्यांच्या गर्दीने वेढले. ही गर्दी एवढी वाढली की अभिनेत्रीला गाडीपर्यंत पोहचायला खूप त्रास झाला. चाहते तिला पाहण्यासाठी, ऑटोग्राफसाठी आणि तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी धक्काबुक्की करताना दिसले. तिच्या अवतीभवती बॉडीगार्ड असूनही ती गर्दीत पूर्णपणे अकडलेली दिसली. निधी संपूर्ण वेळ स्वतःला आणि तिच्या ड्रेसला सांभाळताना दिसली. लोक तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होते.

बॉडीगार्डच्या साहाय्याने आपला गुलाबी रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस सावरत निधी कशीबशी गाडीत जाऊन बसली. गाडीत बसून ती आपला सर्वप्रथम ड्रेस ठीक करताना दिसली. घडलेला प्रकारामुळे निधी खूपच घाबरलेली दिसत होती. निधी अग्रवालचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी यावर संतप्तजनक प्रतिक्रिया देत आहेत. गाण्याचा लाँचिंग इव्हेंट हैदराबादमध्ये पार पडला.

'द राजा साब' हा चित्रपट प्रभासचा आहे. 9 जानेवारी 2026 ला चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मारुती यांचे आहे. चित्रपटात प्रभास, निधीसोबत रिद्धी कुमार, संजय दत्त आणि मालविका मोहनन हे कलाकार पाहायला मिळणार आहे. निधी अग्रवालने बॉलिवूड आणि साऊथमध्ये गाजलेले चित्रपट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अत्यल्प उत्पन्नामुळे खचलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपवलं

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

Tukaram Mundhe : 'मी माझ्या मुलांना कधीच IAS होऊ देणार नाही!' तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले अन् सांगितलं कारण

Peacock Green Colur Saree Design: महिलांसाठी मोरपंखी कलरच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न्स पाहून खूश व्हाल

SCROLL FOR NEXT