TDM Teaser Saam Tv
मनोरंजन बातम्या

TDM Teaser: ख्वाडा, बबननंतर भाऊराव कऱ्हाडेचा टीडीएम प्रेक्षकांच्या भेटीला, टिझर रिलीज

नुकताच चित्रपटाचा बुचकळ्यात पाडणारा टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला तो टीझरही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे दिग्दर्शित, एक आगळीवेगळी कहाणी असलेला ‘टीडीएम’ हा चित्रपट ३ फेब्रुवारी २०२३ ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. पोस्टरपासूनच चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे. नुकताच चित्रपटाचा बुचकळ्यात पाडणारा टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या टीझर पसंतीस उतरत आहे. ग्रामीण, वास्तविक जीवनातील समस्येवर सिनेमातून भाष्य करणाऱ्या भाऊरावांना सिनेइंडस्ट्रीत ओळखले जाते. (Latest Marathi News)

ख्वाडा आणि बबन चित्रपटाच्या यशानंतर विशेष म्हणजे कॉमेडी जॉनर घेऊन भाऊराव पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येत असून या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मितीदेखील ते करणार आहेत. 'चित्राक्ष फिल्म्स' आणि 'स्माईल स्टोन स्टुडिओ' प्रस्तुत सोबतच निर्माते भाऊराव कऱ्हाडे निर्मित 'टीडीएम' या आगळ्यावेगळ्या नावाच्या सिनेमातून भाऊराव ३ फेब्रुवारी 2023 ला प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत. (Tajya Batmya)

टिझरमध्ये आपण पाहू शकता की पिळदार शरीरयष्ठी असलेला तरुण मुलगा काही कष्टाचे काम करताना दिसत आहे. खाणीत एकटा काम करत गाळलेला घाम, कोणाही व्यक्तीची त्याला मदत मिळत नाही. टिझर पाहून हा चित्रपट वास्तविकतेचे दर्शन घडवणार असे काहीसे दिसत आहे. त्यात विशेष म्हणजे चित्रपटाचा टिझर आला असला तरी मुख्य नायकाचा चेहरा अद्याप प्रेक्षकांसमोर आलेला नाही. (Maharashtra News)

चित्रपटात कोण मुख्य भूमिकेत आहे हे अद्याप तरी गुलदस्त्यातच आहे. ही चित्रपटाची कथा इमोशनल किंवा प्रॅक्टिकल नेमकी कुठे वळण घेणार हे ही अद्याप स्पष्ट होत नाही. त्यामुळे चित्रपटात विशेष असे काय असणार याचा अंदाज लागत नाही. हा एक आपल्या गावाशी नाळ जोडणारा चित्रपट आहे इतके मात्र नक्की. (Breaking Marathi News)

चित्रपटाविषयी दिग्दर्शक बोलतात, "'बबन' चित्रपटानंतर बऱ्याच दिवसांनी मी नवीन सिनेमा घेऊन रसिकांच्या भेटीला येतोय, मधल्या काळात लॉकडाऊनमुळे सिनेमात एकंदरीच मनोरंजन क्षेत्रात बऱ्याच घडामोडी झाल्या. पण आता प्रेक्षकांना जास्त वाट पाहावी लागणार नाही. तुमच प्रेम, आशिर्वाद सदैव माझ्यावर आहेत. ३ फेब्रुवारी २०२३ ला,आम्ही घेऊन येतोय तुमचा सिनेमा 'टीडीएम'. अपेक्षा करतो की माझ्या मायबाप प्रेक्षकांना हा उत्कंठावर्धक टिझर नक्कीच भावेल. तुमच्या आवडीच्या गोष्टी लवकरच पडद्यावर आणू."

'चित्राक्ष फिल्म्स' आणि स्माईल स्टोन स्टुडिओ' प्रस्तुत 'टीडीएम' या कॉमेडी जॉनरच्या चित्रपटाच्या निर्मितीची धुराही स्वतः भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी पेलवली असून चित्रपटाची कथा, संवाद, स्क्रीनप्लेची जबाबदारी बी. देवकाते आणि भाऊरावांनी सांभाळली आहे. या चित्रपटाच्या संगीताची बाजू वैभव शिरोळे आणि ओमकारस्वरूप बागडे यांनी पाहिली. चित्रपटाचा टिझर पाहून रसिक प्रेक्षकांना ३ फेब्रुवारी 2023 ची उत्सुकता लागून राहिली आहे, यांत शंकाच नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात मनोज जरांगेंचा एल्गार; काय आहे येवल्यातील मतांचं गणित? पाहा व्हिडिओ

Priyanka Gandhi : PM मोदींचं चॅलेंज प्रियंका गांधींनी स्वीकारलं; शिर्डीतील सभेत नेमकं काय घडलं? पाहा स्पेशल रिपोर्ट

Milk and Pohe: नाश्त्याला दूध आणि पोह्याचे सेवन करणे ठरते फायदेशीर

Govinda Health Update : प्रचारसभेत असताना गोविंदाची तब्येत बिघडली, अर्धवट सभा सोडून घरी परतला

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या सभेच्या खुर्च्या रिकाम्या, पण निवडणुकीच्या दिवशी...; उद्धव ठाकरेंना नेमकी कसली भीती?

SCROLL FOR NEXT